रोज 'इतका' वेळ गॉसिप करतात लोक, जास्त कोण गॉसिप करतं झालं उघड!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2019 11:33 IST2019-05-13T11:24:52+5:302019-05-13T11:33:19+5:30
गॉसिप्स करणे, गप्पा मारणे ही बाब सर्वांनाच आवडते. पण पहिल्यांदाच यावर वैज्ञानिकांनी रिसर्च केला.

रोज 'इतका' वेळ गॉसिप करतात लोक, जास्त कोण गॉसिप करतं झालं उघड!
(Image Credit : muslimgirl.com)
गॉसिप्स करणे, गप्पा मारणे ही बाब सर्वांनाच आवडते. पण पहिल्यांदाच यावर वैज्ञानिकांनी रिसर्च केला. अभ्यासकांचं मत आहे की, लोक दिवसातील ५२ मिनिटे गॉसिप्स करण्यात घालवतात. हा रिसर्च कॅलिफोर्निया-रिवरसाइड यूनिव्हर्सिटीने केला. या रिसर्च उद्देश हा होता की, कोण गॉसिप जास्त करतात आणि किती वेळ करतात.
कोण पुरूष की महिला?
गॉसिपबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी यूनिव्हर्सिटीने ४६७ लोकांना रिसर्चमध्ये सहभागी करून घेतलं होतं. यात २६९ महिला आणि १९८ पुरूष होते. हे सगळे १८ ते ५८ या वयोगटातील होते. रिसर्चमध्ये या सर्वांकडे इलेक्ट्रॉनिकली अॅक्टिवेडेट रेकॉर्डर देण्यात आले होते. यात त्यांचं बोलणं रेकॉर्ड झालं.
(Image Credit : The Conversation)
नंतर त्यांच्या दिवसभराच्या रेकॉर्डिंगचं विश्लेषण केलं गेलं. त्यानंतर रेकॉर्डिंगमधून पॉझिटिव्ह, निगेटीव्ह आणि न्यूट्रल गोष्टींना वेगळं करण्यात आलं. अभ्यासकांनुसार, ज्या गोष्टी एखाद्या व्यक्तीबाबत होत्या आणि ती व्यक्ती तिथे उपस्थित नसेल अशा गोष्टींना गॉसिप श्रेणीमध्ये घेण्यात आल्या.
(Image Credit : The Spruce)
या रिसर्चच्या निष्कर्षानुसार, अधिक वयाच्या तुलनेत तरूण लोक अधिक गॉसिप करतात आणि नेहमी नकारात्मक गोष्टींवर चर्चा करतात. कमी उत्पन्न असलेले लोक जास्त उत्पन्न असलेल्यांच्या तुलनेत कमी गॉसिप करतात. लोकांनी केवळ त्यांची मतं व्यक्त केली असतील तर ती या रिसर्चमधून काढण्यात आलीत. रिसर्चनुसार, जास्तीत जास्त लोक गॉसिप करतात.
(Image Credit : careertoolbelt.com)
अभ्यासक मेगन रॉबिन्सचं म्हणाली की, कुणी गॉसिप करत नाही, असं म्हणणं चुकीचं ठरेल. पण रिसर्चमधून एक बाब स्पष्टपणे समोर आली की, महिला पुरूषांपेक्षा अधिक गॉसिप करतात. त्या जास्तीत जास्त न्यूट्रल गोष्टी शेअर करतात, त्या ना पॉझिटिव्ह आहेत ना निगेटिव्ह.