शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
3
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
4
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
5
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
6
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
7
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
8
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
9
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
10
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
11
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
12
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
13
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
14
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
15
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
16
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
17
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
18
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
20
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात

राशीनुसार जाणून घ्या जोडीदाराच्या स्वभावातील वाईट गोष्टी; ज्या बदलणं असतं कठिण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 1:21 PM

आपल्या जन्मराशीनुसार अनेक गोष्टी समजून घेणं शक्य होतं. आपला स्वभाव, आपलं रिलेशन यांबाबतही राशीनुसार अंदाज बांधणं शक्य होतं, असं मानलं जातं. एवढचं काय राशीनुसार तुमचं कोणत्या राशीच्या व्यक्तीनुसार चांगलं जमू शकतं हेदेखील समजू शकतं.

आपल्या जन्मराशीनुसार अनेक गोष्टी समजून घेणं शक्य होतं. आपला स्वभाव, आपलं रिलेशन यांबाबतही राशीनुसार अंदाज बांधणं शक्य होतं, असं मानलं जातं. एवढचं काय राशीनुसार तुमचं कोणत्या राशीच्या व्यक्तीनुसार चांगलं जमू शकतं हेदेखील समजू शकतं. या सर्व गोष्टी समजू शकतात तर राशीनुसार हेदेखील जाणून घेणं शक्य होतं की, तुमच्या जोडीदाराच्या स्वभावामध्ये कोणते वाईट गुण आहेत, जे अनेक प्रयत्नानंतरही कोणीच बदलू शकत नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जगभरामध्ये कोणीच परफेक्ट नसतं, स्वतः तुम्हीदेखील नाही. परंतु व्यक्तीच्या स्वभावातील कोणता वाईट गुण किंवा कमतरता आहेत ज्या तुम्हाला अधिक त्रासदायक ठरू शकतात. हे तुम्हाला राशीनुसार समजून घेणं शक्य होतं, असं मानलं जातं. जाणून घेऊया प्रत्येक राशीच्या लोकांमध्ये आढळून येणाऱ्या काही कमतरता...

मेष रास

या राशीच्या लोकांमध्ये हिमतीची कमतरता असते, असं मानलं जातं. यांची ही गोष्ट त्यांच्याशी संबंधित लोकांसाठी प्रचंड त्रासदायक ठरते. अजिबात धाडस न केल्यामुळे ही लोकं आयुष्यात अनेक चुकीचे निर्णयही घेतात. यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागतोच पण त्यांच्या आयुष्यातील इतर व्यक्तींसाठीदेखील ही गोष्ट त्रासदायक ठरते. 

वृषभ रास

वृषभ राशीच्या व्यक्तींचा स्वभाव फार केअरिंग असतो. परंतु त्यांच्या हट्टी स्वभावामुळे नात्यांमध्ये अनेकदा दुरावा येतो, असं म्हटलं जातं. या लोकांना आपल्या पद्धतीने प्रत्येक काम करायला आवडतं, त्यामुळे अनेकदा यांच्या जोडीदाराला त्याचा त्रास सहन करावा लागतो. 

मिथुन रास

या राशीच्या लोकांना गोष्टी मॅनेज करता येत नाहीत, असं समजलं जातं. या व्यक्ती अनेक प्लॅन करतात परंतु त्यांचा एकही प्लॅन सफल होत नाही. एकाच दिवशी जोडीदार आणि मित्रांना वेळ देण्यासाठी प्लॅन करतात, पण यांच्या हलगर्जीपणामुळे ते एकही प्लॅन सक्सेसफुल करू शकत नाहीत. 

कर्क रास

कर्क राशीच्या व्यक्ती फार इमोशनल असल्याचं मानलं जातं. तसं पाहायला गेलं तर अशा व्यक्तींसाठी ही चांगली गोष्ट देखील आहे आणि वाईटही. आपल्या भावनांबाबत या व्यक्ती प्रामाणिक असतात. परंतु अनेकदा या व्यक्ती भावनांमध्ये वाहत जाऊन विचित्र गोष्टी करतात. 

सिंह रास

प्रेम आणि काळजीच्या बाबतीत सिंह राशीच्या व्यक्ती फार चांगल्या असतात, असं मानलं जातं. परंतु या व्यक्ती जेवढं प्रेम जोडीदाराला देतात, तेवढ्याच प्रेमाची अपेक्षा जोडीदाराकडून करत असतात. जर पार्टनर त्यांना इग्नोर करत असेल तर यांच्याती अहंकार जागा होतो. यामुळे ते कळत नकळत आपल्या जोडीदाराला फार त्रास देतात. 

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांना सर्वात समजूतदार व्यक्ती मानलं जातं. या व्यक्ती स्वतःला आणि दुसऱ्यांना खूश ठेवण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. परंतु जोडीदार येऊन एखाद्या गोष्टीवरून वाद करत असेल तर यामुळे या व्यक्ती फार दुःखी होतात. या व्यक्ती स्वतःला वाटेल तेच करतात, जोडीदाराच्या मताला प्राधान्य देत नाहीत. 

तुळ रास

तुळ राशीच्या व्यक्तींना प्रत्येक गोष्ट स्वतःच्या नियंत्रणात ठेवायला आवडते, असं मानलं जातं. या व्यक्तींची लव्ह लाइफ आणि मॅरिड लाइफ आनंदी जगण्यासाठी त्या सतत प्रयत्नशील असतात. परंतु अनेकदा ते जोडीदाराला खूश ठेवण्यातच इतक्या बीझी होतात आणि स्वतःचा आनंद हरवून बसतात. 

वृश्चिक रास

या राशीच्या व्यक्ती प्रेमाच्या बाबतीत आपल्या जोडीदाराला कधीच निराश करत नाहीत. परंतु त्यांच्या डोक्यामध्ये कोणता विचार सुरू आहे, याबाबत जाणून घेणं अत्यंत अवघड असतं. या व्यक्ती आपल्या जोडीदाराबाबत कधी, काय विचार करत आहेत, याचा कोणालाच थांगत्ताही लागू देत नाहीत. 

धनु रास

या राशीच्या व्यक्ती कोणत्याही एकाच गोष्टीवर विचार करत नाहीत किंवा एकच गोष्ट करत नाहीत, असं मानलं जातं. या व्यक्तींना प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन गोष्ट करण्याची इच्छा असते. कोणतंही काम किंवा एखादं नातं फार काळ टिकवू शकत नाहीत. त्यामुळे यांच्या जोडीदारालाच नवनवीन ट्रिक्स वापरून नातं टिकवून ठेवावं लागतं. 

मकर रास

मकर राशीच्या व्यक्ती करियर ओरिएंटेड असतात. या व्यक्ती आपल्या पार्टनरसाठी वेळ आणि पैसे खर्च करण्याआधी फार विचार करतात. या व्यक्ती एखाद्या गोष्टीवर लगेचच पैसे खर्च करत नाहीत. 

कुंभ रास

या राशीच्या व्यक्ती सर्वांबाबत सतत विचार करत असतात. नेहमी आपलं कुटुंब आणि मित्रांच्या घोळक्यात राहतात. यामुळे या व्यक्तींच्या रोमॅटिक लाइफवर फार परिणाम होतो. तरिदेखील या व्यक्ती कुटुंब आणि मित्रांना सोडण्यास तयार होत नाही. 

मीन रास

मीन राशीच्या व्यक्ती आपल्या जगामध्ये बीझी असतात, असं म्हटलं जातं. कोणालाही अगदी मनापासून प्रेम करत असतील तर त्यांच्या प्रति पूर्णतः प्रामाणिक असतात. परंतु एखाद्या गोष्टीवर या व्यक्ती फार विचार करतात. यांच्या स्वभावातील हिच गोष्ट बऱ्याचदा यांच्या जोडीदाराला खटकत असते. 

टॅग्स :Relationship TipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिपPersonalityव्यक्तिमत्व