OMG : ​‘या’ पाच कारणांनी ती इग्नोर करते तुमचे फोन कॉल्स !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2017 13:39 IST2017-08-29T08:09:39+5:302017-08-29T13:39:39+5:30

जर आपणासोबतही असे घडत असेल तर तिच्या इग्नोर करण्यामागे हे पाच कारणे असू शकतात. जाणून घ्या ती कारणे...

OMG: 'These' ignite your phone calls for five reasons! | OMG : ​‘या’ पाच कारणांनी ती इग्नोर करते तुमचे फोन कॉल्स !

OMG : ​‘या’ पाच कारणांनी ती इग्नोर करते तुमचे फोन कॉल्स !

एखादी मुलगी तुमचे फोन कॉल्स इग्नोर करीत आहे आणि आपल्याशी न बोलण्याचे निमित्त शोधत असेल तर यामागे काहीतरी कारण अवश्य असू शकते. जर आपणही अशा परिस्थितीतून जात असाल आणि तुमची गर्लफ्रेंड तुमचा कॉल इग्नोर करीत असेल ज्यामुळे तुम्ही त्रस्त असाल तर यामागचे कारण लवकरच शोधायला हवे. बऱ्याचदा आपण महत्त्वाच्या कामानिमित्त कॉल करतो आणि तिच्याकडून रिसिव्ह केला जात नाही किंवा काही मिनिटानंतर ती तुम्हाला मॅसेज करते की, ‘आता मी बिझी आहे म्हणून बोलू शकत नाही.’ अशावेळी तुमचा संताप अजून जास्त वाढतो. यावरुन स्पष्ट जाहीर होते की, तुमच्यापासून लांब राहण्याचे हे निमित्त आहे.   

जर आपणासोबतही असे घडत असेल तर तिच्या इग्नोर करण्यामागे हे पाच कारणे असू शकतात. जाणून घ्या ती कारणे...

१) तुमच्याशी बोलण्यापेक्षा जास्त महत्त्वाचे काम असेल
आपल्या कॉलचे उत्तर न देण्याचे हे एक सर्वात मोठे कारण असू शकते. कदाचित तुमच्याशी बोलण्यापेक्षा तिच्याजवळ अति महत्त्वाचे काम असेल. तिला त्यावेळी असे वाटत असेल की, तुमच्याशी बोलण्यापेक्षा तो वेळ एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी वापरावा. 

२) आपल्यासोबत वेळ घालविणे तिला आवडत नसेल 
यापुढचा वेळ तुमच्यासोबत घालवायची कदाचित तिची इच्छा नसेल. तुम्हाला तिच्यासोबत फिरणे चांगले वाटत असेल मात्र तिला तुमच्यासोबत फिरायला तेवढाच आनंद वाटेलच असे नाही. जर आपण तासंतास एखाद्या मुलीशी बोलत आहात आणि अचानक ती तुमचा कॉल घेणे बंद करते तर ती यापुढे तुमच्याशी बोलू इच्छित नाही, असेही घडू शकते.  

३) आपल्यासोबत बाहेर जाण्यास मनाई करणे  
जर आपण तिला बऱ्याचदा बाहेर भेटायला किंवा फिरायला बोलवत असाल आणि प्रत्येकवेळी ती नकार देत असेल आणि आपला कॉलदेखील उचलत नसेल तर याचा अर्थ असा आहे की, ती तुम्हाला वारंवार नकार देऊन थकली आहे आणि आता ती आपणास एकच गोष्ट वारंवार सांगू शकत नाही. कदाचित या कारणानेही ती तुम्हाला इग्नोर करीत असेल. 
  
४) आपल्यात कोणतीच रुची नसेल
तुमच्यात तिला कोणत्याच प्रकारची रुची नसेल तर ती तुम्हाला इग्नोर करण्यास सुरुवात करते. जर आपणास या गोष्टीची जाणिव स्वत: होत नाही आणि आपण तिला तरीही वारंवार फोन करीत असाल तर आपण समजून घ्यायला हवे की, याचा काही फायदा नाही.  

५) आपण बोअरिंग वाटत असाल 
कदाचित तुमच्यामध्ये तिला काही रुची नसेल आणि तुमच्याशी तिला गप्पा करणे बोअरिंग वाटत असेल म्हणून ती आपला कॉल इग्नोर करीत असेल, असेही घडू शकते. 
   
Also Read : ​Relation : ​या ‘पाच’ कारणांनी आपले सुंदर नाते तुटते तेव्हा !
                   : ​OMG : ​मुलांना अजिबात आवडत नाहीत ‘या’ प्रकारच्या मुली !

Web Title: OMG: 'These' ignite your phone calls for five reasons!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.