OMG : या ‘७’ कारणांमुळे दुसऱ्या लग्नाकडे वळतात लोक !
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2017 12:52 IST2017-09-16T07:18:08+5:302017-09-16T12:52:53+5:30
अगोदरचे लग्न तुटल्यानंतर पुरुष किंवा महिला आपली सेक्सुअल इच्छा पूर्ण करण्यासाठी दुसरे लग्न करणे उचित समजतात, या व्यतिरिक्तही अन्य कारणे आहेत, जाणून घ्या सविस्तर !
.jpg)
OMG : या ‘७’ कारणांमुळे दुसऱ्या लग्नाकडे वळतात लोक !
भ रतात लग्नाच्या बाबतीत हळुहळू लोकांचे विचार बदलत आहेत. काही ठिकाणी अजूनही लग्नाला सात जन्माचे नाते मानले जाते तर काही ठिकाणी हे नाते तुटल्यानंतर किंवा दुरावा निर्माण झाल्यानंतर सर्वकाही विसरुन नवीन आयुष्य सरु करणे पसंत करतात. बॉलिवूडमध्ये तर असे अनेक कपल्स आहेत ज्यांचे पहिले लग्न मोडले आणि त्यानंतर ते सर्वकाही विसरुन दुसरे लग्न करुन आयुष्य जगत आहेत. सेलिब्रिटीच नव्हे तर सामान्य लोकं ही आता काही कारणास्तव पहिले लग्नाचे नाते तुटले असेल तर सर्व काही विसरुन दुसरे लग्न करणे पसंत करतात. बऱ्याचदा असे करण्यामागे अन्य कारणेही असू शकतात. जाणून घेऊया त्या कारणांबाबत...
* लग्न तुटल्यानंतर पुरुष किंवा महिला स्वत:ला एक नवी संधी देऊ इच्छितात, त्यामुळे ते एक नवे नाते किंवा दुसऱ्या लग्नाच्या बाबतीत विचार करु लागतात.
* अगोदरचे लग्न तुटल्यानंतर पुरुष किंवा महिला आपली सेक्सुअल इच्छा पूर्ण करण्यासाठी दुसरे लग्न करणे उचित समजतात.
* काही कपल्स एकमेकांमध्ये काहीनाकाही कमतरता शोधत असतात, त्यामुळे वेळावेळी वाद निर्माण होतात आणि नात्यात दुरावा निर्माण होतो. त्यानंतर साहजिकच दुसऱ्या लग्नाच्या बाबतीत विचार करावा लागतो.
* मुलगा किंवा मुलगी बऱ्याचदा दुसऱ्या व्यक्तींकडे आकर्षित होतात आणि ज्यामुळे ते आपले लग्न तोडून नव्या नात्यात गुंतणे पसंत करतात.
* जर आपल्या पार्टनरला आपली लाइफस्टाइल पसंत नसेल तर या कारणानेही लग्न तुटू शकते. अशावेळी ज्या व्यक्तीची लाइफस्टाइल परफेक्ट असेल अशा व्यक्तीचा शोध सुरु होतो.
* लग्न बंधनात दोघांना एकमेकांचे प्रेम आणि काळजी मिळण्याची सवय झालेली असते. मात्र नाते तुटल्यानंतर ते एकाकी पडतात आणि या एकाकीपणाला दूर करण्यासाठी ते नवे नाते शोधतात.
* बऱ्याचदा पार्टनरद्वारा करण्यात आलेली हिंसादेखील मनात घर करुन जाते आणि आपला आत्म सन्मान आणि चांगले आयुष्य जगण्यासाठी नव्या नात्यात ते प्रेम शोधत असतात.