OMG : ५१ वर्षीय ‘या’ अभिनेत्रीला मिळाला ३५ वर्षाचा बॉयफ्रेंड !
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2017 16:12 IST2017-09-21T10:41:40+5:302017-09-21T16:12:40+5:30
या अभिनेत्रीला ‘मॉन्स्टर्स बॉल’ चित्रपटासाठी आॅस्कर पुरस्कार मिळाला आहे आणि आता ती एका म्यूझिक डायरेक्टराच्या प्रेमात आकांत बुडाली आहे.
.jpg)
OMG : ५१ वर्षीय ‘या’ अभिनेत्रीला मिळाला ३५ वर्षाचा बॉयफ्रेंड !
ह लिवूडची टॉप अभिनेत्री आणि बॉँड गर्ल म्हणून ओळखली जाणारी हॅली बेरी अगदी मनसोक्त जीवन जगत असून तिचा नुकताच ‘द किंग्समॅन : द गोल्डन सर्कल’ हा चित्रपटदेखील रिलीज होत आहे. मात्र ती सध्या तिच्या चित्रपटामुळे नव्हे तर आपल्या नव्या अफे यरच्या कारणाने चर्चेत आहे.

५१ वर्षीय हॅली बेरीला नवा प्रेमी मिळाला असून सध्या ती ३५ वर्षाच्या म्यूझिक डायरेक्टर अलेक्झेंडर ग्रांट उर्फ एलेक्स डा किडला डेट करत आहे. दोघेही दोन दिवसापूर्वी एकत्र दिसले होते आणि या आउटिंगनंतर लगेचच हॅली बेरीने आपल्या इंस्टाग्रामवर दोघांचे फोटो पोस्ट केले होते आणि कॅप्शनमध्ये लिहिले होते...‘माय बॅलेन्स (माझे संतुलन)’

२०१५ मध्ये अभिनेता आॅलिवियर मार्टिनिजपासून विभक्त झाल्यानंतर हॅली बेरीची ही पहिली रिलेशनशिप आहे. डिसेंबर २०१६ मध्ये हॅली आणि मार्टिनिजचा घटस्पोट झाला होता. त्या दोघांना तीन वर्षाचा मुलगादेखील आहे शिवाय पुर्वीचा बॉयफ्रेंड गॅब्रियलपासून एक नऊ वर्षाची मुलगी आहे.
विशेष म्हणजे बेरीचे दोनदा लग्न झाले आहेत. पहिले लग्न १ जानेवारी १९९३ मध्ये अर्ध्या रात्रीनंतर माजी बेसबॉल खेळाडू डेविड जस्टिसशी झाले होते. १९९६ मध्ये मात्र दोघांचा घटस्पोट झाला.
![]()
बेरी मात्र हे दु:ख पचवू शकली नव्हती आणि ती एवढी डिप्रेशनमध्ये आली होती की, तिने आत्महत्या करण्याचा विचारदेखील केला होता मात्र तिच्या आईने हे कदापी सहन केले नसते म्हणून तिने हा विचार बदलला.
आॅक्टोबर २००८ मध्ये बेरीला एस्क्वायर मॅगजीनचा ‘सर्वात कामुक जिवंत महिला’ चा पुरस्कार मिळाला असून याबाबत तिने म्हटले आहे की, ‘मला व्यवस्थित माहित नाही की याचा काय अर्थ आहे, मात्र वयाचे ४० वर्ष होणे आणि एका मुलाला जन्म दिल्यानंतर मला असे वाटते की, मी याला ग्रहण करु शकते.’
source : ndtv