शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

'मर्द को ज्यादा दर्द होता है'... महिलांच्या तुलनेत पुरुषच असतात अधिक हळवे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2019 12:14 IST

जो मर्द होता है उसे दर्द नहीं होता', बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन यांच्या 'मर्द' सिनेमातील हा फेमस डायलॉग आपण बहुतांश वेळा ऐकला असेलच. पण सत्य परिस्थितीत पाहायला गेले तर पुरुषांची अवस्था या डायलॉगच्या अगदी विरुद्धच असल्याचे एका संशोधनाद्वारे सिद्ध झाले आहे.

ठळक मुद्देभूतकाळातील आठवणींना पुरुष देतात वारंवार उजाळामहिलांच्या तुलनेत पुरूष अधिक असतात हळवे

'जो मर्द होता है उसे दर्द नहीं होता', बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन यांच्या 'मर्द' सिनेमातील हा फेमस डायलॉग आपण बहुतांश वेळा ऐकला असेलच. पण सत्य परिस्थितीत पाहायला गेले तर पुरुषांची अवस्था या डायलॉगच्या अगदी विरुद्धच असल्याचे एका संशोधनाद्वारे सिद्ध झाले आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये महिलांच्या तुलनेत पुरुष भूतकाळातील कटू घटना आठवून हळवे होतात, असे मांडण्यात आले आहे.  

महिलांना काही कारणांमुळे किंवा अनुभवांमुळे त्रास होतोच, पण काही काळानंतर महिला त्या कटू आठवणी डोक्यात स्टोअर करुन ठेवण्यापेक्षा विसरणं पसंत करतात. पण पुरुषांच्या बाबतीत ही परिस्थिती अगदी उलट असते, अशी माहिती रिसर्चद्वारे समोर आली आहे. पुरुष त्यांना आलेल्या वेदनादायी अनुभव दीर्घकाळापर्यंत आपल्या आठवणीत ठेवतात.    

1. वेदनादायी अनुभवांना वेगवेगळ्या पद्धतींनी लक्षात ठेवणे : कॅनाडातील युनिर्व्हसिटी ऑफ टोरेंटो मिस्सीसॉगा UTM मधील संशोधनकर्त्यांनी यावर महत्त्वपूर्ण अभ्यास केला आहे. महिला आणि पुरुष त्यांना आलेले वेदनादायी अनुभव स्वभावानुसार वेगवेगळ्या पद्धतींनी लक्षात ठेवतात, असे अभ्यासात नमूद करण्यात आले आहे. एकीकडे पुरुष त्यांचे कटू-वाईट अनुभव कधीच विसरत नाहीत. त्या आठवणी त्यांच्यासोबत आयुष्यभर टिकून राहतात. दुसरीकडे, महिला जीवनातील त्रासदायक गोष्टी पूर्णतः विसरू शकत नसल्या तरी त्या भूतकाळातल्या गोष्टी वर्तमान किंवा भविष्यकाळात येऊ देतात नाहीत. एकूण निरर्थक गोष्टींवर विचार करण्यात जास्त वेळ वाया घालवत नाहीत.   

2. वेदनादायी आठवणींमुळे पुरुष येतात तणावातभूतकाळात घडलेल्या एखाद्या कटू घटना वारंवार आठवून पुरुष तणावात येतात. वाईट अनुभवांच्या आठवणीने ते हायपरेसेन्सेटिव्ह होतात. महिलांनाही एखाद्या त्रासदायक अनुभवांची कधीतरी, कोणत्या-ना-कोणत्या गोष्टींमुळे आठवण होते, पण त्या आठवणींमुळे महिला तणावग्रस्त होत नाहीत. या समस्यांचा महिला सकारात्मक पद्धतीनं सामना करतात. यावर अभ्यास करताना संशोधकांनी महिला-पुरुषांप्रमाणेच उंदरांवरही प्रयोग केला. या प्रयोगामध्ये उंदरांना एका विशेष खोलीत ठेवण्यात आले होते. येथे त्यांना उष्णतेच्या (Heat)मदतीनं निरनिराळ्या पद्धतीनं त्रास देण्यात आला.

दरम्यान, या अभ्यासानुसार, पुरुषांना दुसऱ्या दिवशी महिलांच्या तुलनेत अधिक त्रास जाणवत होता. कारण त्यांनी आदल्या दिवशी देण्यात आलेला त्रास विसरुन न जाता त्याची नोंद डोक्यात पक्की करुन ठेवली होती. 

3. क्रॉनिक पेनशारीरिक वेदना दीर्घकाळापर्यंत टिकून असणे, यास क्रॉनिक पेन म्हणतात. काही जण वारंवार कटू घटना आठवून दुःखी होतात, नैराश्य-तणावग्रस्त, विचारमग्न होतात. क्षणिक दुःख आठवून आपण आपल्या आयुष्यातील मौल्यवान क्षण वाया घालवत आहोत, इतकं साधे गणित त्यांना समजत नाही. त्याच-त्याच घटना आठवून ही माणसं जगणं विसरतात. त्यामुळे शक्य असल्यास अशा लोकांना आपण त्यांच्या त्रासदायक आठवणींतून बाहेर पडण्यास मदत करावी.   

 

 

टॅग्स :relationshipरिलेशनशिपWomenमहिलाResearchसंशोधन