Mother's Day 2020 : 'हे' ठरेल आईसाठी सर्वात बेस्ट गिफ्ट, एकदा देऊन बघाच....

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 12:42 PM2020-05-10T12:42:55+5:302020-05-10T12:49:16+5:30

तुम्हाला आईला क्षणिक आनंद देण्यापेक्षा तिच्या उतारवयात काही वेगळं द्यायचं असेल किंवा तिचं आयुष्य वाढवायचं असेल तर एक वेगळा उपाय आहे.

Mother's Day 2020 : Know how can you make your mother live longer api | Mother's Day 2020 : 'हे' ठरेल आईसाठी सर्वात बेस्ट गिफ्ट, एकदा देऊन बघाच....

Mother's Day 2020 : 'हे' ठरेल आईसाठी सर्वात बेस्ट गिफ्ट, एकदा देऊन बघाच....

googlenewsNext

सध्या लॉकडाऊनमुळे कुणीही हवा तसा मदर्स डे साजरा करू शकत नाहीये. अनेकांनी आईला गिफ्ट देण्याचे वेगवेगळे प्लॅनिंग केले असतील तर त्यांचा हिरमोड झाला असेल. पण तरी सुद्धा आम्ही तुम्हाला आईसाठी एक खास गिफ्ट सुचवणार आहोत. तुम्हाला आईला क्षणीक आनंद देण्यापेक्षा तिच्या उतारवयात काही वेगळं द्यायचं असेल किंवा तिचं आयुष्य वाढवायचं असेल तर एक वेगळा उपाय आहे. या मदर्स डे ला आईसाठी यापेक्षा वेगळं गिफ्ट असूच शकत नाही.

चॅटिंग किंवा कामाच्या फोनचा अडसर न होऊ देता तुम्ही तुमच्या आईसोबत किती दिवसांआधी वेळ घालवला होता? तुम्हाला आठवतं का तुम्ही शेवटचं कधी तिला स्पेशली फोन करून विचारलं की, आई कशी आहेस? किंवा कसं सुरु आहे? शेवटचं कधी तुम्ही आईसोबत चहाचे घोट घेत जीवनाबाबत किंवा भविष्याबाबत गप्पा केल्या? जर हे प्रश्न विचारल्यावर लगेच तुम्हाला दिवस आठवत नसेल तर ही गोष्ट करुन फार काळ लोटला असेल असे गृहीत धरुया. 

आपल्यापैकी अनेकजण जीवनाच्या धावपळीत इतके बिझी झाले आहेत की, त्यांच्या हेही लक्षात येत नाही की आपले आई-वडील आता वृद्ध होत आहे. शेवटची कधी तुम्ही केवळ आईसाठी वेळ घालवण्यासाठी मिटींग कॅन्सल हेही अनेकांना आठवत नसेल. 

आईचं वय वाढतंय...

(IMage Credit : en.newsner.com)

धावपळीच्या लाइफस्टाइलमध्ये आणि कामाच्या वाढत्या ओझ्यामुळे आपण हे विसरुनच जातो की, घड्याळाचे काटे सतत फिरत आहेत आणि येणाऱ्या प्रत्येक दिवसासोबत आईचं वयही वाढत आहे. रोज सकाळी उठल्यावर तिच्या चेहऱ्यावर एक नवीन सुरकुती आलेली असते. तुमचा हात धरुन घराचे तीन माळे झरकन चढून जाणाऱ्या तुमच्या आईला आता हेच तीन माळे चढताना ब्रेक घ्यावा लागतो.  

जरा वेळ काढून तुम्ही तुमच्या आईकडे निट बघाल तर तिच्यात झालेले शारीरिक बदल पाहून कदाचित तुम्हाला धक्का बसेल. पण तितका वेळ कुणाकडे नाहीये. पण आम्ही जर तुम्हाला सांगितलं की, असं काही आहे जे करुन तुम्ही तुमच्या आईचं आयुष्य वाढवू शकता. तर तुम्ही काय कराल? आनंदाने अनेकजण ही गोष्ट आईसाठी नक्की करतील, असं गृहीत धरुन चालूया.

काय आहे रिसर्च?

यूनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामध्ये २०१२ साली करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, ज्या वयोवृद्धांना चांगली साथ मिळते, सहकार्य मिळतं, ते एकटेपणा सोसत असलेल्या लोकांपेक्षा जास्त आयुष्य जगतात. हा रिसर्च १६०० वयोवृद्धांवर करण्यात आला आणि त्यांच्या सोशल संवादाचं निरीक्षण करण्यात आलं. 

काय निघाला निष्कर्ष?

या रिसर्चमधून हे समोर आलं की, एकटेपणा सोसत असलेल्या वयोवृद्धांचं आरोग्य ढासळत आहे. एकटेपणामुळे वृद्धांचं राहणीमानंच खालावत नाही तर याने त्यांचं वजन वाढण्याचा आणि डिप्रेशनमध्ये जाण्याचा धोका वाढतो. तसेच त्यांचा वेळेआधी मृत्यूही होऊ शकतो. एकटेपणा हा कुणालाही निराश करणाराच असतो, पण याचा वाईट प्रभाव वयोवृद्धांवर अधिक बघायला मिळतो. AARP फाऊंडेशननुसार, दिवसाला १५ सिगारेटी ओढल्याने जेवढा प्रभाव आरोग्यावर पडतो, तेवढाच एकटेपणाही तुमच्या आरोग्यावर वाईट प्रभाव करतो.

तुमच्या आजूबाजूला जेव्हा तुमच्यावर प्रेम करणारी लोकं असतात, तुम्ही सतत हसत असता तेव्हा हे तुमच्यासाठी एकप्रकारे औषधच ठरतं. मग वाट कसली बघताय लगेच फोन उचला आणि आईला फोन करा. तसेच थोडा जास्त वेळ काढून तिला भेटा आणि तिच्याशी गप्पा करा. याने नक्कीच त्यांना फायदा होईल. पण यावेळी नेहमीसारखं न भेटता वेगळ्याप्रकारे भेटा.
 

Web Title: Mother's Day 2020 : Know how can you make your mother live longer api

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.