शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
3
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
4
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
5
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
6
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
7
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
8
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
9
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
10
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
11
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
12
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
13
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
14
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
15
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
16
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
17
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
18
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
19
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

लठ्ठ महिलेशी बांधा लगीनगाठ, राहा 10 पट अधिक आनंदात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2018 15:49 IST

सुखी वैवाहिक आयुष्यासाठी काय गरजेचं असतं?.... सामंजस्यपणा, तडजोड करणे, पुरेसा वेळे देणे, कमीपणा घेणे, एकमेकांचा सन्मान करणे, विचारांची देवाणघेवाण करणे इत्यादी- इत्यादी. या यादीमध्ये आणखी एका प्रमाणाचा समावेश झाला आहे.

सुखी वैवाहिक आयुष्यासाठी काय गरजेचं असतं?.... सामंजस्यपणा, तडजोड करणे, पुरेसा वेळे देणे, कमीपणा घेणे, एकमेकांचा सन्मान करणे, विचारांची देवाणघेवाण करणे इत्यादी- इत्यादी. या यादीमध्ये आणखी एका प्रमाणाचा समावेश झाला आहे. हे प्रमाण म्हणजे एखाद्या लठ्ठ महिलेसोबत लग्न केल्यास पुरुष दहा पटीनं आनंदी जगतात आणि हे त्यांच्या सुखी विवाहाचं कारणदेखील ठरू शकतं. ही माहिती आम्ही नाही तर खुद्द संशोधक सांगत आहेत.  

वैवाहिक सुखासाठी गोंडस लठ्ठ महिलेसोबत लग्न करणं फायदेशीर ठरू शकते, असा शोध नॅशनल ऑटोनोमस युनिर्व्हसिटी ऑफ मेक्सिकोच्या (Autonomous University of Mexico) संशोधकांनी लावला आहे. 100 जोडप्यांच्या वैवाहिक जीवनाचा अभ्यास केल्यानंतर संशोधकांनी हा आगळावेगळा शोध लावला आहे. अभ्यासाद्वारे महिलांचा शारीरिक बांधा आणि त्यांच्या पार्टनरच्या सुखाच्या-आनंदीच्या पातळीसंदर्भात काही मनोरंजक गोष्टी संशोधकांनी मांडल्या आहेत. ज्या पुरुषांनी लठ्ठ महिलांसोबत लग्न केले आहे, ते पुरुष आयुष्यात दहा पट आनंदी असल्याचा निष्कर्ष संशोधनाद्वारे समोर आला आहे.   

या उलट हडकुळ्या, बारीक महिलांसोबत लग्न केलेल्या पुरुषांच्या तुलनेत लठ्ठ महिलांसोबत लग्न केलेल्या पुरुषांचे हसण्याचे प्रमाण देखील अधिक असल्याचं निदर्शनास आले. शिवाय, लठ्ठ महिला या रिलेशनशिपमधील समस्या अधिक चांगल्या पद्धतीनं हाताळतात, असेही संशोधकांना आढळून आले आहे. तर हडकुळ्या आणि बारीक महिला पटकन कोणातही न मिसळणाऱ्या, अंतर्मुख स्वभावाच्या, तसंच खूप कमी प्रमाणात व्यक्त असतात.  त्यांचा हा स्वभाव नात्यातील आनंदावर परिणामकारक ठरू शकतो, असेही संशोधनकर्त्यांनी म्हटले आहे.  

एकूणच लठ्ठ महिला पार्टनरला अधिक आनंदात ठेवतात, असा निष्कर्ष नॅशनल ऑटोनोमस युनिर्व्हसिटी ऑफ मेक्सिकोच्या संशोधकांनी मांडला आहे. पण तरीही तुम्ही बारीक आहात किंवा लठ्ठ, याचा फारसा वैवाहिक आयुष्यावर काहीही फरक पडत नाही. कारण हल्लीच्या धकाधकीच्या आणि स्पर्धेच्या आयुष्यात तसंही किरकोळ कारणांमुळे घटस्फोटांचं प्रमाण बरंच वाढले आहे. ऑफिस, काम, करिअर यामुळे जोडपी एकमेकांना पुरेसा वेळ देऊ शकत नाहीयेत.

यामुळे वाढणारे गैरसमज, वादावादी, भांडणं, संशय यांसारख्या कारणांचा आधार घेऊन जोडपी विभक्त होत आहेत. तर अशा शुल्लक कारणांमुळे आपल्या नात्यामध्ये फूट पडू नये, यासाठी तुम्ही किती मेहनत घेत आहात आणि आपल्या पार्टनरला प्राधान्य देऊन वेळ देता आहात,  हे बाब महत्त्वाची आहे. तुम्ही मानसिक-शारीरिकरित्या फिट-निरोगी आहात की नाही, हे अधिक महत्त्वाचे आहे. जेव्हा तुम्ही स्वतः मनानं आणि शरीरानं शांत-आनंदित असाल तेव्हाच तुम्ही तुमच्या पार्टनरच्या सुखाचीही काळजी योग्यरितीनं घेऊ शकता. पटतंय ना, सो ​Size Doesn't Matters.

 

टॅग्स :relationshipरिलेशनशिपmarriageलग्नFitness Tipsफिटनेस टिप्स