LOVE : पहिले प्रेम विसरण्यासाठी वापरा या टिप्स !
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2017 14:15 IST2017-09-03T08:45:36+5:302017-09-03T14:15:36+5:30
जर आपणही यांपैकी एक असाल तर आज आम्ही आपणास काही टिप्स देत आहोत, ज्या आपणास नवीन आयुष्य सुरुवात करण्यास मदत करतील.
.jpg)
LOVE : पहिले प्रेम विसरण्यासाठी वापरा या टिप्स !
म्हणतात की, आयुष्यात प्रत्येक मनुष्य एकदातरी प्रेम करतो आणि हे प्रेम तो कधीही विसरत नाही. त्यातच पहिल्या भेटीतले पहिले प्रेम तर तो आयुष्यातल्या शेवटच्या क्षणापर्यंत विसरु शकत नाही. बॉलिवूडमध्ये याच थिमवर आधारित बरेच चित्रपट आले आहेत. विशेष म्हणजे अशा चित्रपटांना तरुण वर्गाकडून भरघोस प्रतिसादही मिळाला आहे.
बऱ्याचजणांना आयुष्यात खऱ्या प्रेमाचा अनुभव येत असतो. मात्र ते प्रेम त्यांना भविष्यात भेटत नाही आणि आयुष्यात त्यांचा मोठा हिरमोड होतो. निराश होऊन सर्वकाही संपल्यासारखे वाटते. मात्र हा आयुष्याचा शेवट नाही, कारण आयुष्य कधीही कुणासाठी थांबत नाही. आयुष्याचे दुसरे नाव पुढे चालत राहणे होय. असे बरेच लोक आहेत, जे आपल्या जुन्या आठवणी विसरुन पुढे जाण्याची त्यांची इच्छा असते, मात्र ते असे करु शकत नाही. जर आपणही यांपैकी एक असाल तर आज आम्ही आपणास काही टिप्स देत आहोत, ज्या आपणास नवीन आयुष्य सुरुवात करण्यास मदत करतील.
* भूतकाळातील चांगल्या आणि वाईट गोष्टींबाबत विचार करणे त्वरित थांबवा. यामुळे आपणास दु:ख शिवाय काहीच मिळणार नाही.
* आपल्या पार्टनरने दिलेले गिफ्ट किंवा सोबतचे जुने फोटो असतील तर ते घरात अजिबात ठेऊ नका.
* रडण्याची इच्छा होत असेल तर रडून घ्या, यामुळे आपल्या मनातील संताप बाहेर निघण्यास मदत होईल.
* स्वत:ला दुसरी संधी देऊन सावरा आणि लोकांमध्ये सहभागी होण्यास सुरुवात करा.
* ज्यामुळे आपणास आनंद मिळेल असे काही तरी नवीन शिकण्याचा किंवा करण्याचा प्रयत्न करा.
* कुठेतरी बाहेर फिरण्याचे नियोजन करा, जेणेकरुन आपणास थोडे वेगळे वातावरण मिळेल.
* जास्तीत जास्त वेळ परिवार आणि मित्रांसोबत राहा. शक्यतो एकटे राहणे टाळा.
या टिप्स फॉलो केल्यास आपल्या आयुष्यातील नैराश्य दूर होऊन नव्या उमेदीने जीवन जगण्यास प्रवृत्त होऊ शकता.
Also Read : OMG : ब्रेकअप झाल्यानंतर अशाप्रकारे दुसऱ्या मुलीला पटविण्याचा प्रयत्न करतात मुले !
: OMG : प्रेम न करता थेट लग्न करणारे ‘या’ फायद्यांपासून राहू शकतात वंचित !