नव्याने प्रेमात पडला असाल तर पार्टनरसोबत बोलताना या गोष्टींची घ्या काळजी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2018 15:12 IST2018-07-14T13:42:22+5:302018-07-14T15:12:32+5:30
काही कपल्स हे ऐकमेकांशी बोलताना कशाचाही विचार न करता काहीही बोलतात. याचा प्रभाव तुमच्या नात्यावर होतो.

नव्याने प्रेमात पडला असाल तर पार्टनरसोबत बोलताना या गोष्टींची घ्या काळजी!
प्रेमाच पडणं ही या जगातली सर्वात सुंदर भावना असावी. जेव्हा एखादा व्यक्ती कुणाच्या प्रेमात असतो तेव्हा त्या व्यक्तीची काळजी घेणे हे साहजिकच आलं. पण प्रेम जर नवंनवं असेल तर अनेक गोष्टीं उत्साहाच्या भरात बोलल्या आणि केल्या जातात. प्रेमात असलेले लोक एक वेगळ्याच विश्वात रमत असतात. पण काही कपल्स हे ऐकमेकांशी बोलताना कशाचाही विचार न करता काहीही बोलतात. याचा प्रभाव तुमच्या नात्यावर होतो. त्यामुळे एकमेकांसोबत बोलताना काही गोष्टींची काळजी घेणे फार महत्त्त्वाचे आहे. चला जाणून घेऊया काय आहेत त्या गोष्टी...
नात्याबाबत इमानदार रहा
नवीन नात्यात बातचीत होत असताना जास्तीत जास्त प्रश्न हे पर्सनल गोष्टींबाबत असतात. या प्रश्नांची उत्तरं इमानदारीने द्यावी, जेणेकरून तुमचा/तुमची पार्टनर तुम्हाला योग्यप्रकारे समजू शकेल. जर तुम्ही एखाद्या गोष्टीविषयी खोटं सांगितलं आणि ती बाब तुमच्या पार्टनरला बाहेरून कळाली तर त्याला वाईट वाटू शकतं. याने त्याच्या मनात तुमच्याविषची चुकीची धारणा निर्माण होऊ शकते. जर तुम्ही तुमच्यातील एखादी वाईट गोष्ट किंवा तुमची वाईट सवय आधीच पार्टनरला स्वत:हून सांगितली तर कदाचित तुमच्यावरील पार्टनरचा विश्वास वाढू शकतो.
गंमतीतही तुलना करु नका
कधी कधी गंमतीत किंवा रागात काही लोक आपल्या पार्टनरची तुलना दुसऱ्याच्या पार्टनरसोबत किंवा एक्ससोबत करतात. पण कुणालाही त्यांची तुलना इतरांशी केलेली पसंत पडणार नाही. अशाप्रकारे तुलना केल्यास तुमचं नातं अडचणीत येऊ शकतं.
प्रेमाचा पुरावा मागू नका
नातं नवीन असताना अनेकदा काही लोक आपल्या पार्टनरकडे प्रेमाचा पुरावा मागतात. यावर पुरावा म्हणून मिळणाऱ्या उत्तराने भलेही तुम्हाला काहीवेळ बरं वाटत असेल, पण ही गोष्ट पुढे जाऊन पार्टनरला इरिटेट करणारी ठरु शकते. प्रेम ही अनुभवण्याची गोष्ट आहे त्यामुळे त्याचा पुरावा मागणं तुम्हाला अडचणीत आणू शकतं. प्रेम असेल तर ते तुम्हाला दिसेलच पुरावा मागण्याची गरज नाही.
विनाकारणचे प्रश्न विचारु नका
प्रेमात अधिकाराची भावना असते. या भावनेने प्रेरित होऊन अनेकदा काही लोक आपल्या पार्टनरच्या खाजगी आयुष्यात लुडबूड करतात. हे तुमच्या पार्टनरला अजिबात आवडणारं नसतं. त्यामुळे असे प्रश्न विचारूच नये जे तुमच्या पार्टनरला पसंत नाहीयते किंवा त्यांची उत्तरं देताना त्यांना अवघडल्यासारखं होत असेल.