(Image Credit : amarujala.com)

आजच्या काळात सुंदर, सुशील आणि केवळ घर सांभाळणाऱ्या पत्नीचा ट्रेन्ड मागे पडला आहे. आता मुलांना त्यांच्या परिवारांचे विचार बदलले आहेत. वरील सर्व गुणांसोबतच त्यांना आता नोकरी करणारी पत्नी हवी आहे. मुलं असो वा मुली दोघांनाही जोडीदार असा हवाय जो वर्किंग असेल. पण याच्या मागचं कारण काय आहे हे तुम्हाला माहीत आहे का? नोकरी करणारी मुलगीच पत्नी म्हणून का हवी? जाणून घेऊ कारणे...

तुम्हाला आणि तुमच्या कामाला समजू शकते

(Image Credit : www.patrika.com)

जर तुमची पत्नीही नोकरी करणारी असेल तर ती तुमच्यासोबतच तुमच्या कामालाही चांगल्या प्रकारे समजू शकेल. ऑफिसमध्ये कामाचं प्रेशर घेऊन जेव्हा तुम्ही घरी याला तर ती तुमची स्थिती समजू शकते. ती घरी उशीरा येणावरून किंवा घरातील कामात मदत न करण्यावरून चिडचिड करण्याऐवजी शांत राहील. यात दोघेही एकमेकांच्या गोष्टी समजून घेऊ शकतात. अशात कामाची विभागणी केली तर गोष्टी आणखी सोप्या होतील.

घराच्या बजेटमध्ये मिळतो सपोर्ट

(Image Credit : www.continentalvan.com)

मेट्रो सिटी असो वा छोटे शहर दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाईमुळे कुटूंबाचा खर्चही वाढला आहे. प्रत्येक कपलला लग्नानंतर एक चांगलं सुविधाजनक जीवन हवं असतं. सोबतच त्यांना त्यांच्या मुलांसाठीही एक चांगलं भविष्य हवं असतं. अशात परिवारातील केवळ एक व्यक्तीच्या कमाईवर सगळं काही करणं कठीण होतं. त्यामुळेही मुलांना नोकरी करणारी जोडीदार हवी असते. जेणेकरून घर चालवण्यात आर्थिक मदतही होईल.

भविष्यासाठी बचत

जर पती-पत्नी दोघेही वर्किंग असतील तर वर्तमानासोबतच भविष्याच्या दृष्टीनेही बचत करता येते. वाईट वेळ सांगूण येत नाही. त्यामुळे दोघे चांगलं प्लॅनिंग करू शकतात. हे एक मोठं कारण आहे की, मुलांना नोकरी करणारी मुलगी लग्नासाठी हवी असते.

बाहेरील जगाची समज

(Image Credit : wearethecity.com)

सामान्यपणे नोकरी करणाऱ्या महिला या अधिक ओपन माइंडेड असतात. त्यांना कामाचा दबाव मॅनेज करण्याची समज असते. त्यांना बाहेरील दुनियेचीही समज असते. महिलांना घरी कमी असतात असं नाही, पण बाहेर नोकरी करताना काय काय अडचणी येतात हे त्यांना माहीत असतं. त्यामुळे दोघांचं चांगलं पटतं देखील. जर काही अडचण असेल तर प्रोफेशनल पद्धतीने ती सोडवण्याची त्यांची मानसिकता असते.

स्वत:च्या खर्चाची जबाबदारी

(Image Credit : www.financialexpress.com)

मुलींचं वर्किंग असणं हे मुलासाठी आणि मुलीसाठी दोघांसाठीही चांगलं असतं. लग्नानंतर स्वत:च्या छोट्या छोट्या खर्चांसाठी तिला पतीवर अवलंबून रहावं लागत नाही. पतीलाही त्याच्या खर्चांची चिंता नसते. तेच दुसरीकडे पत्नी नोकरी करणारी असेल तर घरातील खर्चासाठीही तिला पतीवर अवलंबून रहावं लागत नाही. दोघेही ताळमेळ बसवून घरातील खर्च उचलू शकतात.

Web Title: Know why boys prefer working women for marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.