मधुचंद्राच्या रात्री गुलाबाच्या पाकळ्यांनी का सजवला जातो बेड? आहे फारच खास कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 04:53 PM2022-02-08T16:53:19+5:302022-02-08T16:54:05+5:30

गुलाबाच्या सुगंधाचा आपल्या मूडशी खूप जवळचा संबंध आहे. खरं तर, गुलाब हे जगभर प्रेमाचे प्रतीक मानलं जातं. तसंच ते शरीरातील नैसर्गिक कामवासना वाढवणारे आहे. याशिवायही इतर अनेक कारणे आहेत. चला तर मग याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

know the reason why room is decorated with roses on honeymoon | मधुचंद्राच्या रात्री गुलाबाच्या पाकळ्यांनी का सजवला जातो बेड? आहे फारच खास कारण

मधुचंद्राच्या रात्री गुलाबाच्या पाकळ्यांनी का सजवला जातो बेड? आहे फारच खास कारण

googlenewsNext

अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की लग्नसमारंभात सर्वत्र गुलाबाच्या फुलांनी डेकोरेशन केलेलं असतं. इतकंच नव्हे तर हनिमूनच्या दिवशी सुद्धा जोडप्याची खोली गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवली जाते. यामागे अनेक कारणे आहेत. सुगंधाचा आपल्या मूडशी खूप जवळचा संबंध आहे. खरं तर, गुलाब हे जगभर प्रेमाचे प्रतीक मानलं जातं. तसंच ते शरीरातील नैसर्गिक कामवासना वाढवणारे आहे. याशिवायही इतर अनेक कारणे आहेत. चला तर मग याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

मेंदूवर सुगंधाचा होतो परिणाम
आयुर्वेदानुसार गुलाब हे नॅचरल ऐफ्रोडिसिऐक आहे. त्याची पाकळ्या शरीरातील दोष दूर करतात. यामुळे, एखाद्या व्यक्तीला सेक्शुअली अ‍ॅक्टिव देखील वाटतं. आयुर्वेदामध्ये लैंगिक जीवन सुधारण्यासाठी, गुलाबाच्या पाकळ्या धुवून खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, सुगंधाचा परिणाम तुमच्या मेंदूवरही होतो. त्यामुळे तुमचा मूड चांगला राहतो.

गुलाबामुळे ताण कमी होतो
गुलाबपाणी हे अँटी-डिप्रेसंट मानले जाते. २०११ च्या अभ्यासात असं दिसून आलं की, गुलाबाच्या पाकळ्यांमुळे उंदरांची मध्यवर्ती मज्जासंस्था शिथिल होते. यामुळे तणावही कमी होतो. म्हणजेच तुमचा मूड चांगला नसेल, तणाव असेल तर तुम्ही गुलाब जवळ ठेवून गुलाबाचा वास घेऊ शकता. यामुळे तुमचा मूड त्वरित सुधारेल.

गुलाबाचे हे फायदे मिळतील
याशिवाय गुलाबाचा वापर अनेक प्रकारे केला जातो. ब्युटी प्रोडक्ट म्हणून गुलाबपाणीचा वापर फार पूर्वीपासून होत आहे. चंदनाच्या मास्कमध्ये गुलाबपाणी टाकल्याने त्वचेवरील सनबर्न बरे होण्यास मदत होते.

Web Title: know the reason why room is decorated with roses on honeymoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.