(image credit-verdict.co.uk)

सध्याच्या काळात अशी परिस्थीती निर्माण झाली आहे की जोपर्यंत तुम्हाला १ ते २ ठिकाणी जॉब करून  अनुभव येत नाही तोपर्यंत तुम्हाला चांगल्या पगाराचा जॉब मिळणं कठिण आहे. अनेकदा आत्मविश्वासाच्या कमतरतेमुळे  तुम्हाला  जॉब मिळेल कि नाही. याबाबत शंका असते.  आज तुम्हाला अशा काही गोष्टी  सांगणार आहोत. ज्यांचा वापर करून तुम्हाला नोकरी मिळवणं सोपं जाऊ शकतं. 

योग्य क्षेत्र  निवडणे

Related image

सगळ्यात आधी तुम्हाला नक्की कोणत्या क्षेत्रात जॉब करायचा आहे. हे समजणं महत्वाचं असतं. कारण सध्याच्या काळात आपण ज्या क्षेत्रात शिक्षण घेतलंय  किंवा जे काम आपल्याला येत असतं. त्याच क्षेत्रात आपल्याला जॉब मिळेल असं काही नाही.  या बाबत शंका असते. कोणत्याही ठिकाणी काम करायची अनेकांची तयारी असते म्हणून आपल्याला नक्की कोणत्या क्षेत्रात काम करायचं आहे.  हे माहीत असणं गरजेचं आहे. 

स्कील्स शिकणे

Related image

जर तुम्हाला लवकरात लवकर जॉब  करायचा असेल तर  लवकरात लवकर पेड, अनपेड  इंटर्नशिप मिळवण्यासाठी प्रयत्न  करा.  त्यासाठी जॉब  नोटिफिकेशन देत असलेल्या वेबसाईट्सवर आपलं लक्ष असू द्या. स्कील्सना ओळखायला शिका.  एका कागदावर तुम्हाला कोणते स्कील्स येतात. काय येत नाही. याचं परिक्षण करा. पावरपॉईंट, माइक्रोसॉफ्ट ऑफिस प्रोग्राम, वेब प्रोग्रामिंग, ब्लॉगिंग, डेटाबेस, ग्राफ़िक डिज़ाइन यांसारखे संगणकीय प्रोग्राम्स शिकून घ्या. 

अनुभवांचा वापर 

Related image

यामुळे तुम्हाला जॉब मिळवण्यासाठी सोपं जाईल. जर तुम्ही आधी कुठे नोकरी केली असेल तर त्या अनुभवांचा वापर  आपल्या पुढील नोकरीसाठी करा.  जर तुम्हाला क्रिएटिव्ह काही कारयचं असल्याल आधी लिहायाला सुरूवात करा.  सोशल मिडीयावर आपला पोर्टफोलियो तयार करा. क्रियाशीलतेने रिज्यूम तयार करा. कारण तुमचा रिज्यूम पाहून तुमचा प्रभाव पडत असतो. त्यामुळे सादरीकरणास योग्य असा तुमचा रिज्यूम असावा.  वेगवेगळ्या जॉब साईट्स वर आपलं प्रोफाईल अपडेट ठेवा.

पार्टटाईम जॉब

Related image

जर तुम्ही  शिक्षण घेत  असाल तर तुम्ही पार्टटाईम जॉब शोधण्याच्या प्रयत्नात रहा.  शक्य असेल तर तुम्ही पूर्णवेळ सुद्धा जॉब करू शकता. जास्तीत जास्त ठिकाणी मुलाखत देण्याचा प्रयत्न करा. ज्यामुळे  तुम्हाला कामाचं आणि एखाद्या ठिकाणाचं वातावरण समजण्यास मदत होईल. एकदा जर तुम्हाला कल्पना आली तर तुम्ही आरामात जॉब मिळवण्यात स्कसेस होऊ शकता.

Web Title: Know how to get job when you are fresher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.