IPL Fever : पुणे सुपरजाएंट्सचे मालिक आणि एम.एस.धोनीमध्ये वाद, साक्षीने दिले हे ज्ञान !
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2017 17:52 IST2017-04-12T12:19:49+5:302017-04-12T17:52:26+5:30
महेंद्र सिंह धोनी आणि आयपीएल टीम राजजिंग पुणे सुपरजाएंट्सचे मॅनेजर यांच्यातील वाद वाढतच आहे. या वादात आता महेंद्र सिंह धोनीची पत्नी साक्षी धोनीने देखील उडी घेतली आहे.
.jpg)
IPL Fever : पुणे सुपरजाएंट्सचे मालिक आणि एम.एस.धोनीमध्ये वाद, साक्षीने दिले हे ज्ञान !
महेंद्र सिंह धोनी आणि आयपीएल टीम राजजिंग पुणे सुपरजाएंट्सचे मॅनेजर यांच्यातील वाद वाढतच आहे. या वादात आता महेंद्र सिंह धोनीची पत्नी साक्षी धोनीने देखील उडी घेतली आहे. पुण्याच्या मालिकचे भाऊ हर्ष गोयनकाने केलेल्या वादग्रस्त ट्वीटवर पलटवार करीत साक्षीने एक फोटो शेअर केला आहे.
काही दिवसांअगोदर गोयनकाने ट्वीट करु न स्टीव स्मिथला जंगलाचा राजा म्हटले होते आणि तो धोनीवर भारी पडेल असे म्हटले होते. मात्र या ट्वीट नंतर धोनीच्या फॅन्सकडून कमेंट्स आल्यानंतर त्याने ट्वीटला लगेच डिलीट केले होते. हर्ष गोयनकाने पुढच्या ट्वीटमध्ये पुण्याचे खेळाडू मनोज तिवारी, अजिंक्य रहाणे, पीटर क्रिस्टन यांना उत्कृष्ट स्ट्राइक रेटचे बॅट्समन म्हटले आहे. आता साक्षी धोनीने एक फोटो शेअर केला आहे. याला हर्षच्या ट्वीटचे उत्तर समजण्यात येत आहे.