शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

या मुलांना ‘शिकवायचं’ तरी कसं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 13:01 IST

संयम आणि चिकाटीबरोबर पालकांकडे या गोष्टही हव्यात..

ठळक मुद्देमुलांचे प्रश्न कोणतेही असोत, योग्य ती उत्तरं मुलांना मिळायलाच हवीत.दृष्य प्रतिमा, गोष्टी.. यासारख्या माध्यमांतून जर मुलांना काही गोष्टी समजावता आल्या तर मुलांच्या मनावर त्या लवकर ठसतात आणि त्या त्यांच्या लक्षातही राहतात.लक्ष एकाग्र करता येऊ शकतील अशा गोष्टींचा चातुर्यानं वापर केला तर मुलांचा अटेन्शन स्पॅन वाढू शकतो.कोणतीही गोष्ट घाईघाईनं शिकवण्यापेक्षा सोप्याकडून अवघडकडे असाच प्रवास असला पाहिजे. काठिण्यपातळी हळूहळू वाढवत नेली पाहिजे.

- मयूर पठाडेआपल्या मुलांशी आपण कसं बोलतो? कायम वसावसा त्यांच्या अंगावर ओरडत असतो कि त्यांच्याशी प्रेमानं, त्यांना समजून घेऊन त्यांच्याशी संवाद साधत असतो? मुलांची आकलनक्षमता उत्तम असेल तर एकवेळ ठीक, पण मुलांचा आयक्यू जर कमी असेल, सर्वसाधारण मुलांपेक्षा त्यांची शिकण्याची गती कमी असेल, तर या मुलांसाठी असं वागणं फारच धोक्याचं ठरू शकतं. कारण त्यांची शिकण्याची क्षमता, इच्छा आणखीच कमी होऊ शकते.मुलांशी कायम त्याच भाषेत बोललं पाहिजे, जी त्यांना समजेल. यावर काही जण असंही म्हणतील, आजकालच्या पोरांना माराचीच भाषा समजते, त्याशिवाय ते वठणीवर येत नाहीत, पण धाकदपटशा कधीच कामाला येत नाही आणि त्याचा फारसा उपयोगही होत नाही. त्या वेळेपुरता कदाचित त्याचा ‘सकारात्मक’ परिणाम दिसू शकेल, पण अंतिमत: मुलांसाठी आणि पालकांसाठीही ते घातकच आहे, असा इशारा संशोधकांनी, अभ्यसकांनीही देऊन ठेवलाय.मुलांचे कोणतेही प्रश्न असोत, ते अगदीच किरकोळ असोत किंवा अवघड, आपल्यालाही न समजणारे.. ते टाळण्यापेक्षा त्यांची योग्य ती उत्तरं मुलांपर्यंतं पोहोचवणं मुलांच्या भवितव्यासाठी फारच उपयुक्त असतात. योग्य ती उत्तरं मुलांना मिळायलाच हवीत.दृष्य प्रतिमा, गोष्टी.. यासारख्या माध्यमांतून जर मुलांना काही गोष्टी समजावता आल्या तर मुलांच्या मनावर त्या लवकर ठसतात आणि त्या त्यांच्या लक्षातही राहतात.मुलांचा, त्यातही लहान मुलांचा आणि ही मुलं जर सर्वसाधारण मुलांपेक्षा कमी आयक्यू असलेली असतील, तर त्यांचा अटेन्शन स्पॅन, म्हणजे लक्ष एकाग्र करण्याची क्षमता खूपच कमी असते. त्यासाठी त्यांचे लक्ष एकाग्र करता येऊ शकतील अशा गोष्टींचा चातुर्यानं वापर केला तर त्यांचा अटेन्शन स्पॅनही वाढू शकतो.कोणतीही गोष्ट घाईघाईनं शिकवण्यापेक्षा सोप्याकडून अवघडकडे असाच प्रवास असला पाहिजे. काठिण्यपातळी हळूहळू वाढवत नेली पाहिजे.ज्यांची शैक्षणिक गती कमी आहे, ज्यांचा कमी आयक्यू आहे, अशा मुलांना बºयाचदा आपल्या बुटाच्या नाड्याही व्यवस्थित बांधता येत नाहीत. पण त्यावर चिडण्यापेक्षा त्यांची ही क्षमता विकसित करून मग तुलनेनं अधिक गोष्टी शिकवण्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. त्यासाठी संयम हवा आणि चिकाटीही. त्याला पर्याय नाही.