लहान मुलांना स्ट्रॉंग बनवायचं असेल तर त्यांना बोलू नका 'या' ५ गोष्टी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2019 11:10 IST2019-10-21T10:59:23+5:302019-10-21T11:10:53+5:30
प्रत्येक व्यक्तीला आपल्या लहान मुलांची काळजी असते आणि ते त्यांच्याबाबत फार जास्त प्रोटेक्टिवही असतात. त्यामुळे पालक मुला-मुलींच्या मार्गात येणारे सर्व प्रयत्न दूर करण्याचा प्रयत्न करत असतात.

लहान मुलांना स्ट्रॉंग बनवायचं असेल तर त्यांना बोलू नका 'या' ५ गोष्टी!
(Image Credit : businessinsider.com)
प्रत्येक व्यक्तीला आपल्या लहान मुलांची काळजी असते आणि ते त्यांच्याबाबत फार जास्त प्रोटेक्टिवही असतात. त्यामुळे पालक मुला-मुलींच्या मार्गात येणारे सर्व प्रयत्न दूर करण्याचा प्रयत्न करत असतात. पण आपण हे नेहमीच लक्षात ठेवायला पाहिजे की, प्रत्येक मुल या जगात आपलं वेगळेपण घेऊन येत असतं आणि ते तुमची इन्व्हेस्टमेंट नाहीत. ते मोठे होईपर्यंत तुम्हाला त्यांची प्रत्येक लहान-मोठी गरज पूर्ण करणं तुमची जबाबदारी आहे. त्यानंतर हळूहळू त्यांना सर्व चॅलेंजेस फेस करायचे असतात. जर तुम्हाला वाटत असेल की, तुमच्या मुलांनी प्रत्येक स्थितीचा सामना करावा तर काही गोष्टी त्यांना अजिबात बोलू नये.
'हे तर फारच सोपंय'
अनेकदा लहान मुलांसमोर एखादी अवघड गोष्ट असते. पण पालक त्यांना सांगतात की, ही गोष्ट अवघड नाही आणि ते आरामात करू शकतील. याचा अर्थ असा अजिबातच नाही की, असं बोलल्याने त्यांना ते काम अवघड वाटणार नाही. त्यऐवजी तुम्ही त्यांना सांगा की, ही गोष्ट त्यांच्यासाठी अवघड असल्याचं तुम्हाला माहीत आहे, पण काहीतरी मार्ग काढून हे काम तुम्ही पटकन करू शकाल. अडचण दूर करण्यासाठी त्यांना थोडं पूश करा, याने त्यांना मदत मिळेल.
अरे..काही नाही झालं...
अनेकदा तुमचं मुल धावता धावता पडतं किंवा त्याला खरचटतं तेव्हा पालक मुलांना म्हणतात की, अरे...काही नाही झालंय, तू पूर्णपणे ठीक आहे. असं तुम्ही त्यांना मजबूत करण्यासाठी म्हणत असता. पण त्यांना त्यावेळी जे फील होतं. त्याची त्यांना जाणीव झाली पाहिजे. त्यामुळे त्यांना जर जखम झाली असेल तर शांतपणे त्यांच्याजवळ जा आणि विचारा की, तू बरा किंवा बरी आहेस ना?
तुला लागेल होईल
लहान मुलं-मुली खूप मस्ती करतात आणि असेही काम करतात ज्याने त्यांना जखम होण्याचा धोकाही असतो. अनेकदा आई-वडील ओव्हर प्रोटेक्टिव होऊ लागतात आणि ओव्हरअॅरक्ट करतात. मुलांना पुन्हा पुन्हा असं म्हणणं की, तुला लागेल, ते काम सेफ नाही, हे ऐकून मुलांना अनसेफ वाटू लागतं. त्यामुळे मुलांना जर स्टाइडवर जायचं असेल तर त्यांना जाऊद्या. जर तो पडण्याची भिती असेल तर तुम्ही तिथे त्यांना पकडण्याठी उभे रहा.
मी करते/करतो
अनेकदा असं होतं की, लहान मुलांना एखाद्या कठीण कामात अडकल्याचं पाहणं त्रायदायक होतं. अनेकदा असं पाहून त्यांचं काम तुम्ही स्वत: करू लागता. जेव्हा मुल एखाद्या अशा कामात अडकलं असेल त्यांना सपोर्ट करा, पण त्यांचं काम तुम्ही पूर्ण करण्यास घेऊ नका. असं केल्याने त्यांच्या आत्मविश्वास कमी होऊ शकतो आणि प्रत्येकवेळी ते तुमची किंवा इतर कुणाची मदत घेत राहतील. त्यामुळेच लहान मुलांना आव्हानांचा सामना करू द्या.
हार मानू नका
काहीच काम होत नाहीये, असा विचार करून तुम्ही हार मानता का? किंवा गोष्टी तुमच्या मनासारख्या होत नसल्याने तुम्ही चिंता करता? हे लक्षात घ्या की, तुमचं मूल आता गोष्टी हॅंडल करणं शिकत आहे. जर ते तुम्हाला हार मानताना बघतील तर ते सुद्धा तसंच करतील.