(Image credit- fox43.com)

मुलांना पॉर्नोग्राफीचं आकर्षण असतं. अनेक मुलं वडिलांच्या मोबाईलवर चोरून पॉर्न बघतात. तर काही पालक स्वतःचं मुलांना स्मार्टफोन घेऊन देतात. त्यामुळे त्यांचे मुलं स्मार्टफोनवर काय बघतात, याची मोठी चिंता पालकांना असते. काहीजण लहान मुलांचा फायदा घेऊन त्यांना चाईल्ड पॉर्नोग्राफीच्या आहारी जाण्यास भाग पाडतात. चाईल्ड पॉर्नोग्राफीबद्दल कायदा काय सांगतो. तसेच आपल्या मुलांना पॉर्नेग्राफीचं शिकार होण्यापासुन कशाप्रकारे वाचवता येईल हे जाणून घ्या.

(Image credit- fox43.com)

चाईल्ड पॉर्न पाहण्यासंबंधीत अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत. अलिकडच्या काळात सीबीआयने एका विशेष  समितीची नेमणूक केली आहे .ज्या समितीद्वारे या प्रकरणासंबंधी खोलात तपासणी केली जाईल. अनेक पॉर्नवेबसाईड्स या बंद करण्यात आल्या आहेत. तरी देखील वॉटस्अॅप, फेसबुक यांसारख्या माध्यामातून या गोष्टी पसरत आहेत. न्युयॉर्क टाईम्सच्या रीपोर्टनुसार मागील वर्षी पोर्नोग्राफीशी संबंधीत अहवाल देण्यात आला होता. त्यात शारीरिक अत्याचार होणाऱ्या मुलांचे प्रमाण आश्चर्यजनक होते. ४५ मिलियनच्या संख्येत लहान मुलांच्या पॉर्नोग्राफीचे व्हिडीयो आणि फोटो आढळून आले आहेत.


   (image credit-Thenocill.com)

मुलांनी आपल्या स्मार्टफोनवर एखादा न्यूड फोटो बघितला. किंवा त्यांच्या स्मार्टफोनवर एखादा न्यूड फोटो कुठल्याही माध्यमातून आला, तर त्याचा अलर्ट पालकांना अॅप्लीकेशनच्या माध्यामातून मिळतो. त्यामुळे आपल्या मुलाच्या स्मार्टफोनमधील न्यूड फोटो डिटेक्ट करून या अँपद्वारे पालकांना अलर्ट मिळवू शकतात. सर्वात पहिल्यांदा हे अँप एखाद्या फोटोमध्ये कुणी माणूस आहे का,  हे निरीक्षण करेल. मग त्यावरून संबंधित फोटो न्यूड किंवा आक्षेपार्ह आहे का, हे ठरवले जाईल आणि त्यानंतरच पालकांना अलर्ट मेसेज दिला जातो. पालकांना माहिती देणा-या या ऍपचं नाव आहे गॅलरी गार्डियन आहे.


    (Image credit- newsbug.info)

 मुलं अभ्यासाच्या नावाखाली एकटे असताना पॉर्न बघतात.सध्याच्या काळात जवळपास सर्वच पालक मुलांना स्मार्टफोन देत असल्यानं मुलं खरच स्मार्टफोनचा काय वापर करतात. हे पालकांना कळू शकत नाही. त्यामुळे आपली मुलं स्मार्टफोनचा गैरवापर तर करत नाही ना, याची काळजी बहुतेक पालकांना असते. त्यामुळे या अँपद्वारे पालक आपापल्या मुलांबाबत बेफिकीर राहू शकतात.

Web Title: How to prevent children's pornography.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.