मुलांना कसं बनवाल ‘जबाबदार’?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 01:20 PM2017-09-25T13:20:59+5:302017-09-25T13:22:29+5:30

..पण तुम्ही स्वत: आहात जबाबदार? तसे असाल तर व्हा निश्चिंत..

How to make children 'responsible'? | मुलांना कसं बनवाल ‘जबाबदार’?

मुलांना कसं बनवाल ‘जबाबदार’?

Next
ठळक मुद्देआपण जबाबदारी स्वीकारतो हे मुलांना दिसलंही पाहिजे. कृतीतून हा संदेश मुलांपर्यंत गेला पाहिजे.कोणतीही गोष्ट करताना मुलांना त्यात सामील करून घेतलं पाहिजे.मुलांसमोर नेहमी चांगलाच आदर्श गेला पाहिजे. सांगायचं एक, करायचं दुसरंच, असं झालं तर मुलं बेजबाबदारच होतील.





- मयूर पठाडे

मुलांना वाढवण्यात नक्कीच फार मोठा आनंद असतो. हा आनंद आपण जसा घ्यायला हवा, तसंच ते मूलही आनंदानं वाढायला हवं. आपलाही प्रयत्न तोच असतो. शिवाय काय काय शिकवायचं, हाही एक सर्वात मोठा प्रश्न असतो. खरं म्हणजे मुलांना कधीच ‘शिका रे, बसा आता, मी शिकवतो तुम्हाला..’ अशा पद्धतीनं शिकवायचा प्रयत्न केला, तर शिकण्यापेक्षा त्यापासून मुलं दूर पळण्याचीच शक्यता जास्त असते. मुलांना जेव्हा त्यांची जबाबदारी शिकवण्याची गोष्ट येते, तेव्हा तर तो फारच कळीचा मुद्दा असतो. तरीही अगदी सहजपणे मुलंना आपल्या जबाबदारीची जाणीव करून देता येऊ शकते. लहान मुलांपासून तरुणांपर्यंत सगळ्यांसाठीच ही गोष्ट खरी आहे. नाहीतर ‘मुलं आमचं ऐकत नाहीत’, हे पालुपद मग घराघरातून ऐक येतंच..

जबाबदारीची जाणीव मुलांना कशी करून द्यायची?
सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपण जबाबदार पालक असायला हवं आणि आपण जबाबदारी स्वीकारतो हे मुलांना दिसलंही पाहिजे. त्यासाठी नुसते शब्दांचे आणि सुचनांचे डोस नकोत, कृतीतून हा संदेश मुलांपर्यंत गेला पाहिजे.
कोणतीही गोष्ट करताना मुलांना त्यात सामील करून घेतलं पाहिजे. त्यांना त्यात इनव्हॉल्व्ह करून घेतलं म्हणजे आपोआपच आपल्या जबाबदारीची जाणीवही त्यांना होते.
मुलांचं काहीही म्हणणं असो, काळजीपूर्वक ते ऐकलं गेलंच पाहिजे. आपली गोष्ट पालक ऐकतात, समजून घेतात आणि त्याप्रमाणे कृतीही करतात, हे मुलांच्या लक्षात आलं म्हणजे त्यांनाही आपल्या जबाबादारीची जाणीव करून देण्याची गरज नाही. ते सहजपणे जबाबदारी घ्यायला शिकतात.
मुलांसमोर नेहमी चांगलाच आदर्श गेला पाहिजे. सांगायचं एक, करायचं दुसरंच, अशा गोष्टी जर त्यांच्यापुढे घडल्या, जबाबदारी ढकलायची प्रवृत्तीच जर सातत्यानं त्यांच्या समोर आली तर मुलं बेजबाबदारच होतील आणि त्यासाठीची कारणंही त्यांच्याकडे तयार असतील..
त्यामुळे पहिले आपली कृती सुधारा, आपण जबाबदार व्हा, मुलंही आपोआपच जबाबदार होतील.

Web Title: How to make children 'responsible'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.