बॉयफ्रेन्डच्या या वागण्यावरून ओळखा त्याला तुमच्याकडून केवळ 'तेच' हवंय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2018 13:31 IST2018-04-05T13:31:39+5:302018-04-05T13:31:39+5:30

काही मुलं मुलींसोबत केवळ शारीरिक सुखासाठी प्रेमाचं नाटक करतात. आणि सगळं काही करून झाल्यावर ते नातं तोडतात. ही कोणत्याही मुलीसाठी साधारण गोष्ट नाहीये.

how to know that your boyfriend consider you as friend with benefits | बॉयफ्रेन्डच्या या वागण्यावरून ओळखा त्याला तुमच्याकडून केवळ 'तेच' हवंय!

बॉयफ्रेन्डच्या या वागण्यावरून ओळखा त्याला तुमच्याकडून केवळ 'तेच' हवंय!

अलिकडे गर्लफ्रेन्ड आणि बॉयफ्रेन्ड यांचं इंटीमेट होणं एक साधारण बाब झाली आहे. मात्र काही मुलींना हे मान्य असतं तर काहींना नाही. याप्रकारच्या नात्यात त्यांना गुंतायचं नसतं. पण अनेक मुलींना हे कळतच नाही की, ज्या मुलासोबत अनेक दिवसांपासून त्या मैत्री निभावत आहेत. त्या मुलाच्या मनात दुसरंच काहीतरी असतं.

असं ब-याचदा होतं की, काही मुलं मुलींसोबत केवळ शारीरिक सुखासाठी प्रेमाचं नाटक करतात. आणि सगळं काही करून झाल्यावर ते नातं तोडतात. ही कोणत्याही मुलीसाठी साधारण गोष्ट नाहीये. यामुळे अनेक मुली डिप्रेशनमध्येही जातात. अशा घटनामुळेच तुम्ही त्या मुलासोबत आहोत त्याची ओळख करून घेणं जास्त योग्य ठरतं. आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टी सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही अंदाज लावू शकाल की, तुमचा मित्र तुमच्यासोबत केवळ सेक्ससाठीच तर प्रेमाचं नाटक करत नाहीये ना....

* असे मुलं जे जास्त टेक्स्ट मेसेज पाठवून बोलतात आणि पुन्हा पुन्हा फोन करत नाहीत. तुम्ही फोन केला की, अश्लिल गोष्टी करतात, फोन सेक्स करण्याचा प्रयत्न करतात, मेसेजमध्येही ते जास्तकरून उत्तर निट देत नाहीत, तुमच्या भावना समजून घेत नाहीत. जर अशा गोष्टी तुम्ही तुमच्या  खास मित्रात नोटीस करत असाल तर वेळीच सावधान व्हा. कारण असेही असू शकते की, तो केवळ सेक्ससाठीच तुमच्यासोबत मैत्री करून आहे.

* जर तुमचा मित्र त्याचं रिलेशनशिप स्टेटस आपल्या मित्रांपासून आणि परिवारापासून लपवतो किंवा तुमच्यासोबत डेट्वर जाऊनही ही बाब मित्रांना सांगत नसेल तर समजून घ्या की काहीतरी गडबड आहे. जर तो तुम्हाला त्याच्या मित्रांसमोर घेऊन जाण्यास घाबरतो, मित्रांसोबत मुव्ही किंवा कुठे बाहेर नेण्यास नाही म्हणतो, तर बरं होईल की, तुम्ही या विषयावर त्याच्याशी मोकळेपणाने बोला आणि याचं नेमकं काय कारण आहे हे जाणून घ्या.

* जर तुम्हाला कधी तुमच्या मित्रासोबत सिनेमा बघायला किंवा डिनरसाठी जायचं असेल आणि तुमचा मित्र काहीतरी कारणं देऊन ते टाळत असेल. जेव्हा कधी सेक्सचा विषय असेल तेव्हा तुमच्याकडे लगेच येत असेल किंवा तुम्ही भेटल्यानंतर नेहमीच सेक्स करत असाल तर समजून घ्या की, त्यासाठीच त्याने तुमच्याशी नातं टिकवून ठेवलं आहे. जितक्या लवकर होईल त्याच्यापासून दूर व्हा.

* जर तुमच्या बॉयफ्रेन्डला तुमच्याबद्दल काहीच जाणून घ्यायचं नाहीये आणि केवळ सिनेमे बघण्यासाठी जायचं असेल तर समजून घ्या की, तुमच्यासाठी त्याच्या मनात काहीच फिलींग्स नाहीयेत. अशात त्याच्याशी खुलेपणाने बोलून त्याच्याकडून अशा वागण्याचं खरं कारण जाणून घ्या. असा व्यवहार करणारे जास्तकरून मुलं हे संधीचा फायदा घेण्यात माहीर असतात.

* अनेकदा काही मुलं ते जे बोलतात तसं काहीच करत नाहीत. त्यामुळे तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवा की, तो तुमच्याशी बोलताना काय काय बोलतो. त्याचं स्वत:चं वागणं त्याच्याशी किती मिळतं जुळतं आहे. अनेकदा असे मुलं केवळ तुमच्यासोबत सेक्स करण्यासाठी तुमचं तोंडभरून कौतुक करतात आणि त्यानंतर त्यांच्या वागण्यात बदल येतो. त्यामुळे खोट्या वचनांच्या फंद्यात न दोन हात दूर राहिलेलंच बरं....

Web Title: how to know that your boyfriend consider you as friend with benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.