प्रेम एक फार चांगली आणि प्रत्येकाला हवीहवीशी वाटणारी भावना आहे. जेव्हा कुणी प्रेमात असतं तेव्हा सगळंच चांगलं वाटायला लागत असतं. एका चांगल्या नात्यात असल्यावर तुमच्या चेहऱ्यावर नेहमी एक हास्य असतं. ज्या व्यक्तीवर तुम्ही प्रेम करता, त्या व्यक्तीसोबत आयुष्यभर राहण्याची संधी मिळाली तर यापेक्षा चांगलं काहीच असू शकत नाही. पण अलिकडे प्रेमाची परिभाषा जरा बदलल्यासारखी वाटते. कमिटेड रिलेशनशिप मिळणं कठिण झाल्याचं दिसतं. आजकाल लोक केवळ आकर्षणामुळे नात्यात राहतात. अशात तुमचं नातं कमिटेड आहे की नाही हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं. ते कसं ओळखायचं हे काही संकेतांवरून जाणून घेता येईल.

भविष्याबाबत उत्साहित नसणे

(Image Credit : www.her.ie)

जेव्हा तुम्ही एका कमिटेड रिलेशनशिपमध्ये असता तेव्हा तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत भविष्याबाबत उत्साहित असता. तुम्ही लग्न, परिवार, शेअरिंग, काळजी या गोष्टींचा विचार करू लागलेले असता. या गोष्टींमुळे तुमच्यात सतत उत्साह राहतो. पण या गोष्टी होतच नसतील तर हे रिलेशनशिप किती टिकेल हे सांगता येणार नाही.

चढ-उतारांना सोबत हॅन्डल करणे

(Image Credit : hyperactivz.com)

कोणतीही स्थिती असो चांगली वा वाइट, तुम्ही दोघे एकमेकांना साथ देता. दोघेही एकमेकांना कोणत्याही स्थितीचा एकट्याने सामना करू देत नाहीत. सर्वच समस्यांमध्ये तुम्ही दोघे एकत्र उभे राहत असाल तर याचा अर्थ असा होते की, तुम्ही कमिटेड रिलेशनशिपमध्ये आहे.

एकमेकांची सवय लागणे

(Image Credit : elitedaily.com)

एकमेकांची सवय असणं हे दाखवतं की, तुम्ही कमिटेड रिलेशनशिपमध्ये आहात. दिवसाची कोणतीही वेळ का होईना, तुम्हाला तुमच्या पार्टनरसोबत रहायचं असतं. कारण तुम्हाला त्यांची सवय झालेली असते. असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कमिटेड रिलेशनशिपमध्ये आहात.

बोलल्याशिवाय राहू न शकणं

(Image Credit : www.freepik.com)

तुमच्यात भांडण झालेलं असेल किंवा तुम्ही दोघे एकमेकांपासून दूर राहत असाल तुम्ही एकमेकांशी बोलल्याशिवाय राहत नाहीत. बोलणं झालं नाही तर तुम्हाला त्रास होऊ लागतो किंवा अस्वस्थ वाटत असेल, काहीही वाद झाला असेल आणि लगेच सोडवत असाल तर ही चांगली बाब आहे.

सपोर्टिव असणं

(Image Credit : annecohenwrites.com)

कमिटेड रिलेशनशिपमध्ये असलेले लोक एकमेकांना सपोर्ट करतात. जेव्हाही पार्टनरला सपोर्टची गरज असते तेव्हा तुम्ही देत असता. कोणत्याही अडचणीच्या स्थितीत तुम्ही पार्टनरची ताकद बनत असाल तर समजा की, तुम्ही कमिडेट रिलेशनशिपमध्ये आहात.

Web Title: How to know if you are in a committed relationship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.