लग्नानंतर सुद्धा एक्सची आठवण येते? तर 'हा' फंडा वापरून नेहमी खूश रहा.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 05:54 PM2020-01-19T17:54:22+5:302020-01-19T18:03:08+5:30

अनेकदा पार्टनरला लग्न झालं असेल तरी आधीच्या गर्लफ्रेंडची किंवा बॉयफ्रेंडची आठवण येत असते.  

How to forget love and girlfriend after marriage | लग्नानंतर सुद्धा एक्सची आठवण येते? तर 'हा' फंडा वापरून नेहमी खूश रहा.

लग्नानंतर सुद्धा एक्सची आठवण येते? तर 'हा' फंडा वापरून नेहमी खूश रहा.

Next

(image credit-buildingblocks.solutions)

अनेकदा पार्टनरला लग्न झालं असेल तरी आधीच्या गर्लफ्रेंडची किंवा बॉयफ्रेंडची आठवण येत असते.  वैवाहिक आयुष्य जगात असताना तिसऱ्या  व्यक्तीची आठवण येणं हे खूपच त्रासदायक ठरु शकतं. कारण नवीनच लग्न होऊन आपल्या आयुष्यात आलेल्या पार्टनरला त्याचा त्रास होऊ शकतो. जर तुम्हाला सुद्धा अशाच काहीश्या प्रसंगांचा सामना करावा लागत असेल  तर आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत  ज्याचा वापर करून तुम्ही आपल्या  स्वतःचं मन वळवण्यासाठी यशस्वी होऊ शकता.

Image result for newly married stress
(image credit-famousastrologerexpert.com)

सत्याचा स्वीकार करा 

Image result for newly married stress
 (image credit-singaporewolrld.sg)

तज्ञांच्या म्हणण्यानुसार एक्सचा सहवास नवीन पार्टनरपेक्षा जास्त काळ असल्यामुळे लग्नानंतर सुद्धा मुलांना  मुलींची आठवण येत असते.  एक्स पार्टनर लांब गेल्यानंतर असं वाटणं स्वाभाविक आहे पण जी व्यक्ती अनेक दिवसांपासून आयु्ष्यात होती त्या व्यक्तीच्या जागी कोणी इतर व्यक्ती आहे या गोष्टीचा स्वीकार करा. 

भेटवस्तू  स्वतःपासून लांब ठेवा

Image result for love gits

प्रेमात गिफ्ट देणे किंवा घेणे हे खूपच कॉमन आहे. कारण यामुळेच नात्यात गोडवा येत असतो. जर तुम्हाला तुमच्या एक्स गर्लफ्रेन्डने काही गिफ्टस् दिले असतील तर  सतत डोळ्यांपुढे ठेवू नका. कारण त्यामुळे तुम्हाला सतत पार्टनरची आठवण येत राहील. ( हे पण वाचा-पार्टनरच्या 'या' गोष्टींमध्ये लुडबुड कराल तर भांडण झाल्याशिवाय राहणार नाही)

फिरायला त्याच ठिकाणी जाऊ नका

Image result for newly married stress

(image credit-www.hotched.co.uk)

गर्लफ्रेन्डबरोबर ज्या ठिकाणी  फिरायला जात होतात. त्या ठिकाणी शक्यतो जाऊ नका. कारण त्यामुळे  तुम्हाला मानसीक त्रास होण्याची शक्यता आहे.  तिच्यासोबत  घालवलेला वेळ तुम्हाला आठवणींच्या माध्यमतून त्रासदायक ठरू शकतो.  म्हणून पार्टनरसोबत वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जा. त्यामुळे तुमचा मुड फ्रेश होईल.

फोटो डिलीट करा 

Image result for delete photos

फोनमधले तेच तेच फोटो बघून तुम्हाला एक्सची आठवण सतत येईल म्हणून  फोटो शक्य होईल तितक्या लवकर डिलीट करा. कारण कोणत्याही पार्टनरला तुमच्या फोनमध्ये एक्सचे फोटो असतील तर आवडणार नाही. या गोष्टीमुळे होणारं भांडण टाळण्यासाठी फोटोज  डिलीट करा. ( हे पण वाचा-'ही' लक्षणं दिसत असतील तर समजा, तुमचं नातं आता तुटायचंच बाकी राहिलय)

आयुष्याकडे नव्याने पहा

 How to forget love and girlfriend after marriage

आयुष्य सुंदर बनवणं तुमच्या हातात असतं. तर तुम्ही आयुष्यात पुढे जाऊ इच्छित असाल तर भूतकाळातील  घटनांना विसरणं गरजेचं आहे. कारण काळानुरूप अनेक गोष्टी बदलत जातात. त्याचा स्वीकार करायला हवा.  कारण तुमचं लग्न जर  इतर कोणाशी झालं असेल तर एकमेकांचे स्वभाव समजून घ्या. तुम्हाला आयुष्यभर त्याच व्यक्तीसोबत राहायचं असतं. जर तुम्हाला जास्त त्रास होत असेल तर ही गोष्ट आपल्या पार्टनरशी शेअर करा. पार्टनर तुम्हाला भूतकाळातील घटना विसरण्यासाठी मदत करू शकतो.  

Web Title: How to forget love and girlfriend after marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.