मुलींनी त्यांच्या राशीनुसार निवडावा पार्टनर, नातं होईल आणखी मजबूत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2019 14:55 IST2019-03-30T14:54:59+5:302019-03-30T14:55:06+5:30
मैत्रीचं नातं जगातल्या सर्वात चांगल्या नात्यांपैकी एक आहे. पण इतर नात्यांप्रमाणे यातही कधी कधी काही चुकीचे योग येतात.

मुलींनी त्यांच्या राशीनुसार निवडावा पार्टनर, नातं होईल आणखी मजबूत
मैत्रीचं नातं जगातल्या सर्वात चांगल्या नात्यांपैकी एक आहे. पण इतर नात्यांप्रमाणे यातही कधी कधी काही चुकीचे योग येतात. पण कधी कधी अचानाक झालेली ओळख चांगल्या मैत्रीत रूपांतरित होते, तर कधी कधी अनेक वर्षांची मैत्री काही सेकंदात तुटते. इतकेच काय तर अनेक वर्ष कुणाशी चांगले संबंधच तयार होत नाही. जर तुम्हालाही चांगल्या मैत्रीचा शोध असेल तर आम्ही तुम्हाला तुम्ही कोणत्या राशींच्या मदतीने चांगले मित्र किंवा पार्टनर बनवू शकता हे सांगणार आहोत.
मेष राशी
मेष राशीच्या लोकांची धनु राशीच्या लोकांशी चांगली मैत्री होऊ शकते. कारण या दोन राशींचं चांगलं पटतं आणि नातंही मजबूत राहतं. धनु राशीच्या लोकांसोबतच सिंह राशीच्या लोकांसोबतही तुमची चांगली मैत्री होऊ शकते.
वृषभ राशी
वृषभ राशीच्या मुलींसाठी मकर राशीचे लोक चांगले ठरू शकतात. या लोकांमध्ये चांगलं पटतं आणि एकमेकांच्या मदतीसाठी या राशींचे लोक नेहमी तयार असतात. त्यासोबतच वृषभ राशीच्या लोकांसाठी कन्या राशीचे लोकही चांगले असतात. तसेच मिथुन राशीच्या लोकांशीही तुमचं चांगलं नातं जमू शकतं.
मिथुन राशी
या दोन राशी मिळूनही चांगली मैत्री होऊ शकते. या राशीचे लोक एकमेकांसाठी उभे राहतात आणि यांची साथ नेहमीच चांगली मानली जाते. सोबतच मिथुन राशीच्या मुलींना तुळ राशीच्या लोकांकडूनही चांगलं सहकार्य मिळतं. तसेच कर्क रास असलेल्यांसाठी मीन राशीचे लोक चांगले ठरू शकतात. त्यासोबतच कर्क राशीच्या मुलींसाठी मकर राशीचे लोक बेस्ट ठरतात.
सिंह राशी
सिंह राशीच्या लोकांसाठी मिथुन आणि धनु राशीचे मित्र-मैत्रिणी चांगले ठरू शकतात. त्यसोबतच कन्या रास असलेल्यांसाठी मिथुन, सिंह राशीचे लोक चांगले मित्र ठरू शकतात.