बाप-लेक-नातवाचा वाढदिवस एकाच दिवशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2016 04:39 IST2016-03-03T11:39:07+5:302016-03-03T04:39:07+5:30

अमेरिकेतील टेक्सास राज्यात राहणा-या कॅसे हॅन यांच्या कुटुंबात त्यांचा आणि त्यांच्या मुलाचा जन्म 29फेब्रुवारीला येतो.

Father-daughter-grandchildren's birthday all in one day | बाप-लेक-नातवाचा वाढदिवस एकाच दिवशी

बाप-लेक-नातवाचा वाढदिवस एकाच दिवशी

ong>29 फेब्रुवारीला ज्यांचा वाढदिवस असतो त्याचा वाढदिवसही चार वर्षांतून एकदा येतो. अशा व्यक्तींना नेहमीच खास वाटत असणार यात काही शंका नाही. आपल्या वाढदिवसाची खरी तारीख चार वर्षांतून चार वर्षांतून येणं ही तशी दुर्मिळ बाब. पण, अमेरिकेतील एका कुटुंबात मात्र चक्क तिघांचा वाढदिवस एकाच तारखेला आहे आणि ती तारीख म्हणजे 29 फेब्रुवारी.

अमेरिकेतील टेक्सास राज्यात राहणा-या कॅसे हॅन यांच्या कुटुंबात त्यांचा आणि त्यांच्या मुलाचा जन्म 29फेब्रुवारीला येतो. पण, विशेष म्हणजे त्यांना 2016 सालच्या फेब्रुवारी महिन्यात एक मुलगी झाली आणि ती पण 29 फेब्रुवारीला. या सर्व घडामोडी कोणीही जाणून बुजून केलेल्या नाहीत, तर हा निव्वळ योगायोगाचा भाग आहे असे कॅसे हॅन यांचे म्हणणे आहे. आम्ही तिघेही आमचा वाढदिवस जल्लोषात साजरा करू असे त्यांचे म्हणणे आहे. 

Web Title: Father-daughter-grandchildren's birthday all in one day