लग्नाचं नातं हे प्रेम आणि विश्वासावर टिकलेलं असतं. या नात्यात प्रेम आणि समर्पणासाठी दोघांनाही मेहनत घ्यावी लागते.  एकीकडे एखादी छोटीशी गोष्ट दोघांमध्ये वाद निर्माण करू शकते तर दुसरी काही शब्द ऐकून पत्नी पतीवरील सगळा राग विसरू शकतात. अनेकदा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडताना आणि धावपळीचं जीवन जगताना पुरूष मनासारखं जगणं विसरून जातात. सतत तणावामुळेही असं होतं. पण पुरूषांनी हे लक्षात घ्यायला हवं की, पत्नीला आनंदी ठेवण्यासाठी तुम्हाला फार काही केलंच पाहिजे असं नाही. दोन शब्द प्रेमाचे देखील त्यांना बराच आनंद देऊन जातात.

जाऊदे...काही हरकत नाही!

जर पत्नीकडून एखादी चूक झाली तर पती सवयीनुसार सामान्यपणे त्यांच्यावर रागावतात. पण रागावण्याऐवजी एकदा प्रेमाने म्हणून बघा की, जाऊदे, काही हरकत नाही...कधी कधी अशा चुका होतात. काळजी करू नको. मी सगळं ठीक करेन. इतके जरी शब्द वापरले तर पत्नीच्या मनात तुमच्या विषयी आणखी प्रेम आणि सन्मान वाढेल.

फोन करशील...

(Image Credit : stocklib.com)

जर तुमची पत्नी एकटी गावाला जाणार असेल तर त्यांना म्हणा की, पोहोचल्यावर आठवणीने फोन कर किंवा मेसेज कर. याने त्यांना जाणीव होईल की, तुम्हाला त्यांची काळजी आहे. असं बोलल्याने तुमच्या पार्टनरला चांगलं वाटेल आणि त्यांच्या मनात तुमच्याविषयी आणखी प्रेम वाढेल.

कसा गेला तुझा दिवस?

(Image Credit : 21andmarried.com)

हे गरजेचं नाही की, प्रत्येकवेळी तिनेच तुमच्या दिवसभरातील गोष्टींची विचारपुस करावी. कधी कधी वेळ काढून तुम्ही सुद्धा त्यांना त्यांचा दिवसा कसा गेला हे विचारू शकता. पण इतकंच करून भागणार नाही तर ते ज्या सांगत आहेत, ते कान देऊन ऐका. त्यांना हे चांगलं वाटेल की, पती आपल्या गोष्टींवर लक्ष देत आहे. सोबत एखादी अडचण सोडवून दिल्यासही त्यांना चांगलं वाटेल. 

मी करतो, तू राहुदे....

(Image Credit : modspace.in)

जेव्हा तुमच्या पत्नीच्या मागे कामांचं ओझं असतं तेव्हा तुम्हीही त्यांना मदत करू शकता. 'मी करू लागतो', असं म्हणाल तर तुमची पार्टनर नक्कीच खूश होईल. त्यांना याचा आनंद वाटेल की, तुम्हाला त्यांना होणाऱ्या त्रासाबाबत जाणीव आहे आणि सोबतच मदतीसाठीही तयार आहात. आजच्या धावपळीच्या जीवनात महिला घरात आणि बाहेरील कामांमध्ये चांगला बॅलन्स ठेवतात. तर अनेकदा त्यांना खूप काम असेल तर तुम्हीही त्यांची मदत करू शकता. याने भांडणही होणार नाहीत.


Web Title: Every woman wants to hear these 4 things from her partner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.