प्रत्येक मुलाला माहीत असायला हव्यात मुलींबाबतच्या या 7 गोष्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2018 16:12 IST2018-05-23T16:12:21+5:302018-05-23T16:12:21+5:30
अनेकदा समोरच्या मुलीला अनेकजण काही न जाणून घेता त्या व्यक्तीविषयी आपलं मत तयार करतात. पण हे चुकीचं आहे. चला जाणून घेऊया मुलींच्या अशाच काही गोष्टी ज्या प्रत्येक मुलाला माहीत असल्या पाहिजे.

प्रत्येक मुलाला माहीत असायला हव्यात मुलींबाबतच्या या 7 गोष्टी
मुलींबाबत काही मुलांमध्ये अनेक गैरसमज असतात. लोक सहज मुलींना काहीही बोलून मोकळे होतात. तसं तर महिलांच्या मनात काय सुरु असतं हे कळणं कुणासाठीही कठीणच आहे. त्यामुळे अनेकदा समोरच्या मुलीला अनेकजण काही न जाणून घेता त्या व्यक्तीविषयी आपलं मत तयार करतात. पण हे चुकीचं आहे. चला जाणून घेऊया मुलींच्या अशाच काही गोष्टी ज्या प्रत्येक मुलाला माहीत असल्या पाहिजे.
- मुलींचं मन हे फार संवेदनशील असतं. मुलांपेक्षाही अधिक संवेदनशीलता मुलींमध्ये असते. मुली मुलांच्या तुलनेत अधिक इमोशनलही असतात.
- आपलं कौतुक कुणालाही पसंत असतं आणि मुलींना ते थोडं जास्तच आवडतं. जर मुलींच्या नव्या ड्रेसचं किंवा ज्वेलरीचं कुणी कौतुक केलं तर त्यांना खूप आवडतं. छोट्या छोट्या गोष्टींवर आनंदी होणं, नाराज होणं या त्यांच्या अदांमधील खास गोष्टी आहेत.
- जास्तीत जास्त मुलींना मित्र-मैत्रिणींसोबत गप्पा मारणं अधिक आवडतं. मैत्रिणींसोबत त्या दिलखुलास गप्पा करतात. कारण आपल्या समाजात आजही काही महिला आपल्या पतीसोबत मनमोकळ्या गप्पा मारु शकत नाहीत.
- हसणं सर्वांनाच आवडतं. ज्या मुलांची विनोदबुद्धी चांगली असते अशी मुले मुलींना आवडतात. मुलींना हसवण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या मुलांवर मुली भाळतात.
- प्रेम दोन्ही लोक करतात, काही झालं की, खापर नेहमी मुलींच्या माथ्यावर फोडलं जातं. त्यामुळे मुली आपल्या मनातील गोष्टी सांगण्यासाठी जरा कचरतात आणि व्यक्त होण्यासाठी त्या मुलांपेक्षा जास्त वेळ घेतात.
- नेहमीच मुलींच्या बाबतीत ही धारणा असते की, सगळ्याच मुलींना मेकअप करणं अधिक पसंत आहे. पण असं नाहीये. काहींना ते आवडतं तर काहींना नाही. हा पूर्णपणे वैयक्तीक भाग आहे.
- मुली कोणत्याही बाबतीत मुलांपेक्षा कमी नसतात. मुलींच्या शरीराच्या कार्यप्रणालीत आणि मुलांच्या शरीराच्या कार्यप्रणालीत थोडं अंतर असतं.
(वरील गोष्टी सर्वच मुलींबाबत खऱ्या आहेत असा दावा आम्ही करत नाही. पण काही मुलींबाबत हे लागू होऊ शकतं.)