मुलींबाबतच्या 'या' गोष्टी प्रत्येक मुलांना माहीत असायलाच हव्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2018 16:28 IST2018-07-16T16:27:05+5:302018-07-16T16:28:01+5:30
मुली आणि त्यांचा स्वभाव समजणे अशक्यच, असे आपण नेहमी ऐकतो. त्या फार चंचल असतात, त्या दुसऱ्यांच्या भावना समजून घेत नाहीत, त्यांना अनावश्यक बडबड करण्याची सवय असते.

मुलींबाबतच्या 'या' गोष्टी प्रत्येक मुलांना माहीत असायलाच हव्या!
मुली आणि त्यांचा स्वभाव समजणे अशक्यच, असे आपण नेहमी ऐकतो. त्या फार चंचल असतात, त्या दुसऱ्यांच्या भावना समजून घेत नाहीत, त्यांना अनावश्यक बडबड करण्याची सवय असते. अशा अनेक गोष्टी मुलींबाबत, त्यांच्या स्वभावाबाबत बोलण्यात येतात. पण खरचं असं आहे का, असा कधी विचार केलाय? जाणून घेऊयात मुलींबद्दलच्या अशा काही गोष्टी ज्या प्रत्येक मुलाला माहित असणे गरजेचे आहे.
- मुली मनाने फार हळव्या असून मुलांच्या तुलनेत त्या अधिक संवेदनशील असतात. त्यांना पटकन कोणी ओरडले तर त्यांना लगेच त्याचे वाईट वाटते आणि लगेच रडू कोसळते. तसेच मुली मुलांच्या तुलनेत अधिक इमोशनल असतात.
- मुलींना त्यांची स्तुती केलेली आवडते. त्यांनी एखादा नवीन ड्रेस घातला असेल किंवा नवीन ज्वेलरी घातली असेल तर तुम्ही त्यांची स्तुती केली तर त्यांना फार आनंद होतो. छोट्या छोट्या गोष्टींवरून खुश होणं किंवा छोट्या छोट्या गोष्टींवरून दुःखी होणं हा त्यांच्या स्वभावाचाच एक भाग आहे.
- मुलींना त्याच्या मित्रमैत्रिणींशी जास्तीत जास्त वेळ बोलायला प्रचंड आवडतं. त्यांच्याशी त्या दिलखुलास गप्पा मारतात. बऱ्याचदा आपल्या मानतल्या गोष्टीही त्या मित्रमैत्रिणींशी शेअर करतात.
- हसणं सर्वांनाच आवडतं. जर मुलांचा सेन्स ऑफ ह्युमर चांगला असेल, तर मुलींना ते फार आवडतात. त्यांना हसवण्यासाठी वेगवेगळे प्रयतन करणारी मुलं त्यांना फार आवडतात.
- बऱ्याचदा मुलींच्या बाबतीत असा समज असतो की, त्यांना मेकअप करायला फार आवडते. परंतु, हा समज खोटा आहे. प्रत्येक मुलीला मेक अप करायला आवडते असेच नाही. हा प्रत्येकाचाच वैयक्तिक प्रश्न आहे. त्यामुळे काहींना मेकअप करायला आवडतो तर काहींना आवडत नाही.
- मुली कोणत्याच बाबतीत मुलांपेक्षा कमी नसतात. फक्त काहीशा वेगळ्या असतात. त्यांच्या शारिरीक आणि मानसिक कार्यप्रणाली ही मुलांच्या शारिरीक आणि मानसिक कार्यप्रणालीपेक्षा बऱ्याच प्रमाणाच वेगळी असते. त्यामुळे या गोष्टी प्रत्येक मुलींच्याबाबतीत लागू होतीलच असे नाही.