शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

Relationship Tips: प्रेमात फार गरजेची आहे 'ही' गोष्ट, का कुणासाठी प्रेमाचा ऑप्शन बनावं? 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 2:24 PM

प्रेमात एखाद्याला सोडून देणे किंवा एखाद्याकडून सोडून दिलं जाणं. या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पण याहूनही सर्वात वाइट स्थिती असते ती म्हणजे ब्रेकअपचा सामना करणं.

(Image Credit : www.firstlookfamilylaw.com)

प्रेमात एखाद्याला सोडून देणं किंवा एखाद्याकडून सोडून दिलं जाणं. या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पण याहूनही सर्वात वाइट स्थिती असते ती म्हणजे ब्रेकअपचा सामना करणं. यातून बाहेर पडायला वेळ नक्कीच लागतो खरा मात्र यातून बाहेर येऊ शकता. मात्र, या तिनही गोष्टींपेक्षा अधिक वाइट स्थिती काय असते ती आम्ही सांगणार आहोत. ती स्थिती म्हणजे एखाद्याच्या लव्ह लाइफसाठी तुम्ही ऑप्शन सारखं असणे. तुम्ही म्हणाल असं कसं? तुम्ही जर अशा स्थितीतून गेले नसाल कर आजूबाजूला बघितल्यावर तुम्हाला असं चित्र नक्कीच बघायला मिळेल.

असं का होतं?

(Image Credit : www.sheknows.com)

तुम्ही कुणाशी इमोशनली जोडले गेलेले असाल. फक्त जोडले गेले नसाल, त्या व्यक्तीवर प्रेम करत असाल. पण ती व्यक्ती तिसऱ्याच व्यक्तीसाठी क्रेझी आहे. त्या तिसऱ्या व्यक्तीसोबत भांडण झालं किंवा काही अडचण आली तर त्याला किंवा तिली तुमची गरज भासते. असं केवळ मैत्रीच्या नात्यात ठीक आहे. पण जर नातं मैत्रीच्या पलिकडलं असेल तर ही स्थिती ठीक नाही.

बॅक सपोर्ट आणि स्टॅंड बाय रोमॅंटिक ऑप्शन

(Image Credit : www.independent.co.uk)

एखाद्या आयुष्यात तुम्ही पर्यायासारखे असाल तर यापेक्षा भावनात्मकदृष्ट्या वाइट काहीच होऊ शकत नाही. कारण या स्थितीत तुमचं नातं दुसऱ्या व्यक्तीच्या मूड आणि नात्यांवर निर्भर असतं. त्या व्यक्तीच्या आयुष्यात सगळंकाही ठीक असेल तर तुमची त्यांना गरज पडत नाही. आणि काही अडचणी असतली तर तुम्ही त्यांच्यासाठी सेकंड ऑप्शन असता. म्हणजे याला एखाद्या मित्रासारखा बॅक सपोर्ट देणं म्हणता येणार नाही. याला स्टॅंड बाय रोमॅंटिक ऑप्शन म्हटलं जातं. म्हणजे, कुछ नहीं तो तुम ही सही...

स्वत:ला विचारा प्रश्न

(Image Credit : vivaglammagazine.com)

अशाप्रकारच्या स्थितीमध्ये तुम्हाला तुमच्या भावनात्मक कमजोरींवर नियंत्रण मिळवून स्वत:ला प्रश्न विचारायला हवा. तुम्हाला तुमच्या या नात्यातून काय हवंय? तुमची स्वप्ने काय आहेत? त्या स्थितीत काय होईल जेव्हा ऑप्शन म्हणून तुमचा वापर करणारी व्यक्ती तुम्हाला पूर्णपणे एकटं सोडून त्याच्या किंवा तिच्या लाइफमध्ये बिझी होईल? 

खऱ्या प्रेमाचा शोध

(Image Credit : www.elitedaily.com)

या स्थितीतून बाहेर पडण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे फिरणं, नवीन लोकांना भेटणं, नवीन गोष्टी एक्सप्लोर करणं. या नव्या सुरूवातीमध्येच तुम्हाला हे जाणवेल की, तुमचं महत्व काय आहे. तुम्ही जर स्वत:ची किंमत करणार नाही तर दुसरे तुमची किंमत का करतील? त्यामुळे स्वत:ला महत्त्व द्याल तर दुसऱ्यांसाठीही तुम्ही महत्त्वाचे व्हाल.

पुढच्यावेळी कसे भेटाल?

(Image Credit : radio.com)

काही अडचण आल्यावर तुम्हाला ऑप्शनसारखं वापरणारी व्यक्ती तुमच्या समोर आली तर काय कराल? यावेळी त्या व्यक्तीला सांगा की, तुम्ही त्याला किंवा तिला हवे असाल तर त्यासाठी त्यांना मेहनत करावी लागेल. त्यांना तुमची किंमत करावी लागेल, तुम्हाला जिंकावं लागे आणि त्यानंतर तुमचं प्रेम मिळवावं लागेल'.

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिप