डॉल्फिनने मारला आयपॅडवर ताव!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2016 14:53 IST2016-08-19T09:23:18+5:302016-08-19T14:53:18+5:30
एक डॉल्फिन मासा हौदाच्या किनाऱ्या जवळ आला आणि महिलेच्या हातातील आयपॅड हिसकावून पाण्यात ओढला

डॉल्फिनने मारला आयपॅडवर ताव!
आ ा तुम्ही म्हणाला की, आयपॅड काय खायची गोष्ट आहे का? अहो पण हे आपल्याला माहिती आहे, ते जाऊन डॉल्फिनला कोण सांगणार. तसे पाहिले तर डॉल्फिन फार शांत आणि आपला मित्र मासा म्हणता येईल एवढे चांगले असतात. परंतु कधीकधी त्यांच्या मुड ठिक नसेल तर त्याची किंमत मोजावी लागू शकते.
याचा प्रत्यक्ष अनुभव अमेरिकेतील एका महिलेला आला. त्याचे झाले असे की, ओरेलॅण्डो शहरातील ‘सीवर्ल्ड’ मत्सालयात ही महिला गेली होती. एका मोठ्या हौदामध्ये असणाऱ्या डॉल्फिन्सला पाहण्यासाठी लोकांची गर्दी जमलेली होती. ही महिला पण तेथे उभा होती.
अचानक एक डॉल्फिन मासा हौदाच्या किनाऱ्या जवळ आला आणि महिलेच्या हातातील आयपॅड हिसकावून पाण्यात ओढला. हे पाहून तर तेथे उपस्थित सर्वच जण आश्चर्यचकित झाले. प्रसंगावधान दाखत या महिलेने पाण्यात हात टाकून आयपॅड बाहेर काढला.
परंतु जे नुकसान व्हायचे ते झालेच. आयपॅड पाण्यात भिजल्यामुळे महिलेचा चांगलाच तिळपापड झाला असणार. डॉल्फिन व त्याचे सहकारी मात्र जाम खुश दिसत होते.