(Image Credit : rotarydarmarathon.com)
जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये असता तेव्हा विश्वास ही दोघांसाठी सर्वात मोठी ताकद असते. कारण या विश्वासावरच नातं जिवंत राहतं. पण कधी कधी दोघांकडूनही अशा काही गोष्टी घडतात की, नात्याची गाठ सैल होऊ लागते. अशाच काही चुका आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ज्या चुका पार्टनरचा विश्वास तोडण्यापेक्षाही वाईट आहेत.
खोटं बोलणे
आपण बालपणापासूनच शिकत असतो की, खोटं फार जास्त काळ लपून राहू शकत नाही. तरी सुद्धा अनेकजण पार्टनरसोबत खोटं बोलतात. पण खोटं टाळलं पाहिजे, खासकरून तेव्हा जेव्हा नातं नवीन असतं. कारण नात्याची सुरूवात खोट्याने झाली तर या नात्यात तुम्हाला आनंद मिळूच शकणार नाही.
फायद्यासाठी नात्यात राहणे
असं गरजेचं नाही की, रिलेशनशिप नेहमी एकसारखंच चालत रहावं. वेळेनुसार जेव्हा तुम्ही एकमेकांना चांगलं समजू लागता तेव्हा आपापसातील वाद समोर येऊ लागतात किंवा एकमेकांसोबत सहज राहू शकत नाहीत. तरी सुद्धा तुम्ही ते नातं कायम ठेवलं असेल, मग ते समाजाच्या भीतीने असो वा एकमेकांच्या सुविधेसाठी असो हे नातं तुम्हाला त्रासाशिवाय काहीच देऊ शकणार नाही. असं करणं सुद्धा दगा देण्यापेक्षा कितीतरी पटीने वाईट आहे.
बोलणं बंद करणे
असं नेहमीच ऐकायला मिळतं की, छोट्या छोट्या गोष्टी मोठ्या वाढतात. या गोष्टींना रिलेशनशिपमध्ये फार महत्त्व असतं. तुम्ही आपसात भांडण करता किंवा एखाद्या वेगळ्याच कारणाने रिलेशनशिप सुरळीत नसेल तर एकमेकांशी बोलणं बंद करता. हे फारच चुकीचं आहे. याने प्रश्न सुटणार नाहीत. त्यापेक्षा पार्टनरसोबत बोला.
स्वार्थी होणे
रिलेशनशिपमध्ये समानतेची भावनाच दोन्ही पार्टनरला एकमेकांमध्ये बांधून ठेवतात. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये केवळ तुमच्या आनंदासाठी असाल, तुम्ही केवळ तुमच्या इच्छांचा विचार करत असाल तर याने तुमच्या पार्टनरला दु:खं होईल. त्यामुळे रिलेशनशिपमध्ये स्वार्थीपणा ठेवणे टाळा.