जुळ्या बहिणींची दमदार बॉडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2016 05:44 IST
जेनी व लूनी तब्बल 12 तास जीममध्ये कसरत करताना घालवितात
जुळ्या बहिणींची दमदार बॉडी
लंडनमधील जेनी व लुनी या जुळ्या बहिणी सध्या चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. दोघी दिसायल जेवढ्या सुंदर आहेत तेवढ्याच त्या दमदारही आहे. जुळयांच्या सवयी जवळपास सारख्याच असतात असे मानले जाते. हे आपल्या डोळ्याने पाहायचे असेल तर जेनी व लूनी यांना पाहयाला हवे. जेनी व लूनी तब्बल 12 तास जीममध्ये कसरत करताना घालवितात. या दोधींची बॉडी पाहिल्यास चांगले रेसलर देखील मागे पडतील असेच वाटायला लागते. 29 वर्षीय जेनीने दोन वर्षांपूर्वी व्यायामाला सुरुवात केली होती. तर लुनी मागील एक वर्षांपासून तिच्यासोबत व्यायाम करीत आहे.जेनी व लुनी न्यूकॅसेल असून नॅशनल अमेचॉर बॉडी बिल्डिंग असोसिएशनची कॉम्पिटीशन जिंकण्यासाठी मेहनत करीत आहे. दिवासातून सात वेळा वेगवेगळे डायट त्या घेतात. विशेष म्हणजे फारच कमी दिवसांत लुनीने जेनीसारखी बॉडी बनविली आहे. दोघांचे खान-पान व रहन सहण सारखेच आहे.या दोघींना मिस टोंड कॅटेगरीमध्ये विजेतेपद मिळवायचे आहे.