कसा कमी कराल नात्यातील दुरावा? 'या' टिप्सने नात्याला द्या नवा तडका!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2019 14:56 IST2019-09-04T14:56:09+5:302019-09-04T14:56:25+5:30
पती-पत्नी दोघेही जेव्हा वर्किंग असतात तेव्हा दिवस कसा सुरू होतो आणि कसा संपतो हे कळतच नाही. त्यामुळे दोघांनाही एकमेकांसाठी वेळ काढणं कठीण होऊन बसतं.

कसा कमी कराल नात्यातील दुरावा? 'या' टिप्सने नात्याला द्या नवा तडका!
पती-पत्नी दोघेही जेव्हा वर्किंग असतात तेव्हा दिवस कसा सुरू होतो आणि कसा संपतो हे कळतच नाही. त्यामुळे दोघांनाही एकमेकांसाठी वेळ काढणं कठीण होऊन बसतं. अशात एक पार्टनर जर कामानिमित्त आउट ऑफ स्टेशन राहत असेल तर दुसऱ्या पार्टनरला एकटेपणा जाणवणे सामान्य बाब आहे. अशात नात्याचा ओलावा टिकवून ठेवण्यासाठी टेक्नॉलॉजीची मदत घेतली जाऊ शकते.
लाइफमध्ये ही गोष्ट गरजेची
आनंदी जीवनासाठी पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफमध्ये बॅलन्स ठेवणं गरजेचं आहे. हाच महत्वाचा मुद्दा आहे, ज्याने नात्याची जवळीकता टिकून राहते. पण असं गरजेचं नाही की, आपण नेहमीच असं करू शकू. अनेकदा परिस्थिती साथ देत नाही आणि आयुष्याच्या वेगळ्या गोष्टीवर अधिक लक्ष द्यावं लागतं.
नकळत होऊ लागतं असं
दोन्ही पार्टनरने सोबत क्वालिटी टाइम स्पेंड करणं गरजेचं आहे. याने एकमेकांची भावनिक गरज भागते आणि दोघांचीही जवळीकता अधिक मजबूत होते. पण कामाच्या वाढत्या तणावामुळे नकळत आपण याकडे कानाडोळा करू लागतो. इथूनच एकटेपणाची भावना वरचढ होऊ लागते.
मूडी होतात असे पार्टनर
ज्या महिलांचे पती जास्त वेळ घराच्या बाहेर राहतात आणि दिवसातून केवळ १० ते १५ मिनिट पत्नीसोबत बोलू शकतात, अशा महिला नेहमीच एकटेपणाच्या भावनेने वेढल्या जातात. याचा त्यांच्या मूडवर वाईट प्रभाव पडतो. स्थिती उलट असेल तर पुरूषांसोबतही असंच होतं.
वाढते पार्टनरची जबाबदारी
तुम्ही जर तुमच्या पार्टनरपेक्षा जास्त वेळ बिझी राहत असाल आणि पार्टनरला वेळ देऊ शकत नसाल, तर जमेल तसा फिरायला जाण्याचा प्लॅन करायला हवा. जेणेकरून पर्सनल लाइफ बॅलन्स राहील.
असे राहू शकता कनेक्टेड
जर तुमचा पार्टनर बिझनेस आणि कामामुळे दुसऱ्या शहरात किंवा देशात जात असेल तर अर्थातच तुम्हाला त्यांच्याशी बोलण्याची फार संधी मिळत नसेल. गरजेचं नाही की, तो तुमच्यासाठी सतत मोबाइलवर राहील. पण तुम्ही त्यांना रोमॅंटिक मेसेज करूच शकता.
कायम राहते जवळीकता आणि समजूतदारपणा
वेळेच्या कमतरतेमुळे आपल्या फीलिंग्स पार्टनरसोबक शेअर करू शकत नसाल तर तुम्ही त्यांना मेल करू शकता. अंतर हे फिजिकल असलं पाहिजे, इमोशनल नाही. जेव्हा त्यांना वेळ मिळेल तेव्हा ते तुम्हाला रिप्लाय करतीलच. यादरम्यान तुम्हाला एक वेगळ्याच लेव्हलची जवळीकता जाणवेल. कारण शब्दांमध्ये फार ताकद असते.