शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

मुलगी हाताबाहेर चाललीये? -असं वाटतं तुम्हाला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 17:45 IST

मुलगी ऐकत नाही, उलट उत्तरं देते, असं पालक म्हणतात तेव्हा नेमकं कुठं आणि काय चुकलेलं असतं?

ठळक मुद्देमुलांचं वय वेडच असतं, समजून पालकांनी घेतलं तर मुलं बिघडत नाहीत.

-योगिता तोडकर

ज्योतीची आई माझ्याकडे आली होती. तिच्यातलं आईपण भलतंच अस्वस्थ झालं होतं. ज्योती नववीत मध्ये शिकत होती. तिची आई म्हणाली, 2-3 वर्ष झाली असतील हिच्या अवतीभोवती मुलांचा वावर वाढला आहे. बॉयफ्रेण्डही असावा असं मला वाटतं.  काळजी वाटते हो. हिचा स्वभाव खूपच सरळ, कोणी फसवेल तर याचं दडपण येतं.  खूपदा समजावलं पण हे चक्र  काही थांबायला तयार नाहीये. आम्ही तिला  रागावलो, चिडलो, बोललो खूप. पण कोडगी तर होत चाललीये ती? आईवडील म्हणून आम्ही काय करायला हवं.  मी त्यांना म्हटलं ज्योतीला पाठवा माझ्याकडे मला तिच्याशी बोलायला आवडेल. ज्योती माझ्याकडे आली. एकदम निष्पाप चेहरा. गुटगुटीत. पण थोडी घाबरट. मला तिच्याशी बोलताना जाणवलं कि ती स्वतर्‍च्या आईलाच स्वतर्‍ची स्पर्धक मनात होती.   माझी आई एकदम स्लिम ट्रिम आहे. कशी छान दिसते ती . हवे तसे कपडे तिला घालता येतात. माझ्या खूप मैत्रिणी पण ज्या स्वतर्‍ला  मेंटेन करतात, त्या त्यांना हवं तसं राहतात. त्यांच्या मागे मुलं लागतात. त्यांना बॉय फ्रेंड असतात. मी बारीक व्हावं म्हणून आई माझ्याकडून व्यायाम, डाएट सगळं करून घेते. मीपण सगळं करते. कारण मलाही आईसारखं, मैत्रिणींसारखं सुंदर दिसायचंय. पण एवढं करून मी बारीक होतच नाहीये. त्यात माझ्या  काही मित्नां बद्दल कळल्यावर आई आणि बाबा दोघेही मला रागावले. आणि  मग जे मला मिळत नाहीये ते मिळवावंच अस वाटायला लागलं. इतरांसारखं माझ्याही आयुष्यात घडू शकत यामुळे मी खुश झाले. आई दादाला रागवत नाही त्याच्या मैत्रीणींबद्दल. पण मला रागवते.  मग मला तिचा कधीकधी राग येतो. तिच्याशी सगळं बोलावसं वाटत नाही.  खरंतर मुलांचं हे वय गृहीत धरता त्यांच्या मित्न मैत्रिणी आणि त्यांचं वागणं याचा प्रभाव निश्चित जास्त असतो. पण आपली मुलगी थोडी जाड असली म्हणून आईने तिला किती टोमणे मारावे? जेरीस आणावं?  आपल्या कपड्यांचा आपल्या मुलीला हेवा वाटेल असा पेहराव आईने करावा का? उलट मुलांना त्यांच्यामध्ये कोणत्या चांगल्या गोष्टी आहेत याची ओळख करून द्यायला हवी, स्वतर्‍वर प्रेम करायला शिकवायला हवं. म्हणजे त्यांच्या वागण्याचा नेमकेपणा त्यांच्या लक्षात येतो. ज्योतीची  आईने पुढील काही गोष्टी केल्या असत्या तर, ती हे सगळं सहजपणे हाताळू शकली असती. 1) सगळ्यात पहिली गोष्ट मुलीचा हार्मोनल बॅलन्स चेक करून घेणं. मुलगी त्यामुळे जाड होत नाहीये ना यासाठी डॉक्टरांची मदत घ्यायला पाहिजे.

2)  आपली मुलगी बारीक होणं गरजेचं आहे कि ती निरोगी आणि सुदृढ असणं हे लक्षात घेणं व हेच आपल्या मुलीला समजावून सांगणं.

3) मुलगा असो व मुलगी दोघांनाही एकत्न बसवून मैत्नीचं नातं कसं निर्माण करावं, ते कसं जपावं हे समजावून सांगावं. त्याचप्रमाणे आपले मित्र  मैत्रिणी करतात, ती प्रत्येक गोष्ट बरोबरच असेल असं नाही. 4) मुलांना रंगे हात पकडल्याने, आपण त्यांच्यात आणि आपल्यात एक प्रकारचं अंतरच निर्माण करतो. नात्यातला विश्वास गमावतो. ‘उद्याचे तुमचे आयुष्याचे जीवन साथीदार निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आम्ही तुम्हाला देऊ. त्यासाठी साथ पण देऊ. पण आपली आवड कशी ओळखावी’ याबद्दल त्यांच्याशी बोलावं.

लेखिका समूपदेशक आहेत.

लेखिका समूपदेशक आहेत.