(Image Credit : dailymail.co.uk)

जर तुम्ही पार्टनरच्या शोधात असाल आणि अशात कुणी तुम्हाला सांगितलं की, त्यासाठी तुमचं व्याकरण चांगलं असलं पाहिजे. तर प्रश्नात पडाल ना? नक्कीच कुणालाही असं काही सांगितलं तर अर्थातच प्रश्न पडेल. पण एका रिसर्चमधून असा दावा करण्यात आला आहे की, ज्या लोकांचं ग्रामर म्हणजेच व्याकरण चांगलं नसतं, त्यांना प्रेम किंवा पार्टनर शोधण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. eharmony या ऑनलाइन डेटिंग वेबसाइटने हा रिसर्च केलाय. 

(Image Credit : dailymail.co.uk)

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, जर तुम्ही कुणासोबत डेटवर जात असाल किंवा ऑनलाइन पार्टनरचा शोध घेत असाल तर तुमचं व्याकरण चांगलं असलं पाहिजे. जेणेकरून तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला इम्प्रेस करू शकाल. या रिसर्चमध्ये सांगण्यात आले आहे की, जर तुम्ही वाक्य बरोबर लिहिली नाहीत किंवा तुम्ही योग्य उच्चार केला नाही तर प्रेम मिळवण्यात तुम्हाला अडचणी येऊ शकतात. 

(Image Credit : www.zoosk.com)

या रिसर्चमध्ये सांगण्यात आले आहे की, जे लोक ऑनलाइन डेटिंग करत आहेत किंवा कुणाला ऑनलाइन डेट करण्याचा विचार करत आहेत, त्यांचं व्याकरण चांगलं असावं. नाही तर त्यांना समोरच्या व्यक्तीकडून चांगला रिस्पॉन्स मिळणार नाही. रिसर्च असंही सांगतो की, लोक ऑनलाइन डेटिंग करताना उच्चारण आणि शब्दांच्या स्पेलिंगमध्ये फार चुका करतात. 

तसेच रिसर्चमध्ये असेही निदर्शनास आले की, महिलांना असं वाटत असतं त्यांच्या पार्टनरचं व्याकरण चांगलं असावं. रिसर्चमध्ये ८८ टक्के सहभागी महिलांनी सांगितले की, पार्टनर निवडताना व्याकरण महत्वपूर्ण भूमिका बजावतं. त्याचप्रमाणे ७५ टक्के पुरूषांनी देखील हे मान्य केलं की, ते अशाच मुलींकडे आकर्षित होतात किंवा अशाच मुलींना पार्टनर बनवण्याची इच्छा असते, ज्यांचं व्याकरण चांगलं आहे.


Web Title: Bad grammar can stop a person from finding love study
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.