शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

​आणि शेवटी गुगलची ‘ड्रायव्हरलेस’ कार दाखल...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2016 17:01 IST

अनेक वर्षापासून ज्या कारची उत्सुकता होती, ती म्हणजे गुगलची ड्रायव्हरलेस कार म्हणजेच विनाचालक चालणारी कार पहिल्यांदाच जगासमोर सादर करण्यात आली असून ‘वेमो’ ही कंपनी येत्या कालावधीत या कारचे विविध मॉडेल्स मार्केटमध्ये लॉन्च करणार आहे.

अनेक वर्षापासून ज्या कारची उत्सुकता होती, ती म्हणजे गुगलची ड्रायव्हरलेस कार म्हणजेच विनाचालक चालणारी कार पहिल्यांदाच जगासमोर सादर करण्यात आली असून ‘वेमो’ ही कंपनी येत्या कालावधीत या कारचे विविध मॉडेल्स मार्केटमध्ये लॉन्च करणार आहे. गुगल आणि अ‍ॅपलसारख्या दिग्गज टेक्नोसिव्ह कंपन्यांबरोबरच अनेक कार उत्पादक कंपन्यांचे स्वयंचलीत कारवर मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू आहे. मात्र सर्वप्रथम गुगलने आपण वाहकाविना चालविणारी कार विकसित करत असल्याचे जाहीर करून या शर्यतीत आघाडी घेतली होती. २००९ साली गुगलचा हा प्रोजेक्ट सुरू झाला होता. यानंतर या कंपनीच्या वाहकाविना चालणाऱ्या कारच्या अनेक चाचण्या घेण्यात आल्या होत्या. गुगलने या चाचण्यांची माहिती जाहीरपणे सादर केली होती. यात नित्यनेमाने अपडेटही करण्यात येत होते. या पार्श्वभूमिवर अलीकडेच गुगल कंपनी स्वयंचलीत कार नव्हे तर यासाठी लागणारी आॅपरेटींग प्रणाली विकसित करत असल्याची अफवा उठली होती. विशेष करून अ‍ॅपल कंपनीच्या कंपूने याला हवा दिली होती. मात्र गुगलने यावर काहीही प्रतिवाद न करता थेट स्वयंचलीत कार जगासमोर सादर करून सर्व अफवांचे खंडन केले.गुगलच्या स्वयंचलीत कार विभागाचे प्रमुख जॉन क्रॉफ्कीक यांनी सानफ्रान्सिस्को येथील पत्रकार परिषदेत या संदर्भात महत्वाची घोषणा केली. एक तर गुगलचा हा प्रोजेक्ट आता संशोधनात्मक पातळीवरून थेट व्यावसायिक पातळीवर पुढे सरकला आहे. गुगलने आपल्या या प्रोजेक्टला ‘वेमो’ म्हणजेच ‘न्यू वे फॉरवर्ड इन मोबॅलिटी’ या नव्या कंपनीत परिवर्तीत केले असून जॉन क्रॉफ्कीक याचे सीईओ आहेत. आता आगामी काळात ‘वेमो’ कंपनी स्वयंचलीत कार जागतिक बाजारपेठेत लॉंच करणार असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. आगामी काळात कोणते मॉडेल्स सादर करण्यात येतील याबाबत माहिती देण्यात आली नसली तरी यासाठी गुगल अन्य आॅटोमोबाईल कंपन्यांशी करार करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.  गुगलने आपल्या स्वयंचलीत वाहनांबाबत अगदी विस्ताराने माहिती जगासमोर सादर केलेली नाही. मात्र आजवर प्राप्त माहितीनुसार यातील काही मॉडेल्समध्ये सुकाणू आणि क्लच व गिअर्स असतील तर काहींमध्ये याला देण्यात आलेले नसेल. काही मॉडेल्समध्ये ड्रायव्हरच्या शेजारच्या सीटवर तर काहींमध्ये मागी दोन सीटमध्ये या कारला नियंत्रीत करण्यासाठी बटने देण्यात आलेली असतील. यात आपत्कालीन स्थितीत थांबविण्यासह नेमका कोणत्या मार्गावरून प्रवास करायचा आहे? याच्या नियंत्रणाचा समावेश असणार आहे. अर्थात सर्व मॉडेल्समध्ये अत्यंत उच्च दर्जाचे सेन्सर्स आणि नेव्हीगेशन प्रणाली असेल.आगामी काळात कोणते मॉडेल्स सादर करण्यात येतील याबाबत माहिती देण्यात आली नसली तरी यासाठी गुगल अन्य आॅटोमोबाईल कंपन्यांशी करार करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रसंगी क्रॉफ्कीक यांनी एका व्हिडीओद्वारे आपण अमेरिकेत कुठे कुठे चाचण्या घेतल्या याची माहितीदेखील दिली. गुगलने गेल्या सुमारे आठ वर्षात अब्जावधी डॉलर्स खर्च करून वाहकाविना चालणारी कार विकसित केली असून आजवर सुमारे २० लाख किलोमीटरपेक्षा जास्त अंतरापर्यंत याच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत हे विशेष. गेल्या वर्षी स्टीव्ह महन या अंध व्यक्तीने यातून अगदी गजबजलेल्या रस्त्यावरून प्रवास केला होता तेव्हाच या प्रोजेक्टच्या यशस्वीतेवर शिक्कामोर्तब झाले होते. आता गुगलने याला अधिकृतपणे जाहीर करून दुजोरा दिला आहे.