हौशी खगोलशास्त्रज्ञाच्या नजरी ‘गुरूलीला’
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2016 16:24 IST2016-03-30T23:24:26+5:302016-03-30T16:24:26+5:30
अवकाशात फिरणारे काही दगड गुरूच्या कक्षेत ओढले गेले आणि धुळीचा प्रचंड लोट अवकाशात उडाला.

हौशी खगोलशास्त्रज्ञाच्या नजरी ‘गुरूलीला’
आ ले विश्व अफाट आहे. अनेक रंजक आणि रहस्यमय गोष्टी आणि घटनांची आपल्या विश्वात कमी नाही. अशी एक अद्भूत घटनेचा साक्षीदार होण्याचे भाग्य आॅस्ट्रेयातील हौशी खगोलशास्त्रज्ञ गेरीट केमबॉरला मिळाली आणि त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही.
रोज रात्री टेलिस्कोपद्वारे अवकाशातील ग्रहताऱ्यांचे निरिक्षण करण्याचा गेरेटचा छंद आहे. त्यादिवशी तो नेहमीप्रमाणे निरिक्षण करत असताना, गुरू ग्रहावर घडत असलेली एक विलक्षण घटना त्याच्या नजरेस पडली.
अवकाशात फिरणारे काही दगड (किंवा लघुग्रह) गुरूच्या कक्षेत ओढले गेले आणि लाखो बॉम्ब एकवेळेस फुटावे तसा स्फोट झाला आणि धुळीचा प्रचंड लोट अवकाशात उडाला.
सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह म्हणजे ‘गुरू’. त्याच्या गुरूत्वाकर्षणामुळे असे लघुग्रह त्याच्यावर आदळत असतात. सर्व ग्रहांचा रक्षक म्हणूनही तो ओळखला जातो. एकाच वेळी 1.25 कोटी टन टीनटी विस्फोटक फुटावे एवढा प्रचंड मोठा आघात यावेळी झाला.
या घटनेला दुजोरा देत बॅड अॅस्ट्रोनॉमीचे फिल प्लेट यांनी सांगितले की, वर्षातून किमान एकदा तरी अशी घटना घडत असते. 1994 साली शूमेकर-लेव्ह 9 नावाचा लघुग्रह गुरू ग्रहावर आदळण्याची घटना नासाच्या शास्त्रज्ञांनी पाहिली होती.