(Image Credit : shynesssocialanxiety.com)

बालपणी किंवा त्यानंतरही मिळालेल्या शिक्षणाचं पुढे जाऊन तुमच्या जीवनात मोठं योगदान राहतं. पण अनेकदा असं होतं की, काही मुलं सामान्यपणे कितीही सहजतेने वागत असले तरी एखाद्या मुलीशी बोलण्याचा विषय आला तर त्यांचा आत्मविश्वास डगमगतो. जर तुम्हालाही अशी समस्या असेल तर काही टिप्स वापरून तुम्ही आत्मविश्वास परत मिळवू शकता.'

(Image Credit : hackspirit.com)

मुलींशी बोलण्यात तुम्हाला अडचण येत असेल किंवा तुम्ही सहज नसाल तर ही समस्या लगेच दूर करा. कारण जेव्हा तुम्ही एखाद्या ठिकाणी नोकरी करण्यासाठी जाल, तेव्हा तुमचा आमना-सामना अनेक मुलींशी होऊ शकतो. अशात तुम्हाला त्यांच्याशी बोलण्यात अडचण आली तर तुमचं इम्प्रेशन बिघडू शकतं. 

(Image Credit : www.alovestorygame.com)

हे अवघडणं दूर करायचं असेल तर ज्या मुलीशी बोलायचं आहे, तिच्या नजरेशी नजर मिळवून तिच्याशी बोला. अशाप्रकारे बोलताना तुम्ही तुमच्या बोलण्यावर फोकस करू शकाल आणि तुमच्यात आत्मविश्वासही जागा होतो. 

(Image Credit : loveisallcolors.com)

जेव्हा कधी एखाद्या मुलीशी भेटाल तेव्हा एक हलकी स्माईल चेहऱ्यावर असू द्या. उगाच फार जास्त हसल्याने किंवा जोरजोरात हसल्याने तुमचं इम्प्रेशन बिघडू शकतं. त्यामुळे फार जास्त हसूही नका आणि फार जास्त गंभीरही राहू नका. नॉर्मल रहा आणि बिनधास्त बोला.
कोणत्याही मुलीला भेटायला जाणार असाल तर व्यवस्थित तयार होऊन जावे. भेटण्याचा उद्देश कोणताही असो डेट असो किंवा मीटिंग त्यांना व्यवस्थित तयार मुलं आवडतात. असं कराल तर तुमचा पन्नास टक्के प्रभाव तर आधीच पडतो आणि असंही होऊ शकतं की, तुमच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित होऊन ती स्वत:हून तुमच्याशी बोलू शकते. 

(Image Credit : loveisallcolors.com)

तसेच मैत्रीसाठी पुढाकार घ्यायचा असेल तर जेव्हाही एखाद्या मुलीला भेटायला जाल तेव्हा त्यांच्यासाठी एखादं गिफ्ट किंवा त्यांना सरप्राइज द्यायला विसरू नका. कारण मुलींना सरप्राइज आवडतात. पण याकडे लक्ष द्या की, गिफ्ट किंवा सरप्राइजमुळे तिला राग येऊ नये. एकदा जर तुम्ही मुलींशी बोलायला लागाल तेव्हा तुम्हाला आपोआप तुमच्यातील भीती दूर झालेली बघायला मिळेल. 

Web Title: Afraid to talk with girls? Use these tips to get Confidence...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.