सायन्सनुसार पुरूषांना महिलांच्या तुलनेत उशीरा येते मॅच्युरिटी!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2019 01:04 PM2019-08-09T13:04:49+5:302019-08-09T13:11:06+5:30

सामान्यपणे ग्रॅज्युएशन झाल्यावर लोक मॅच्युअर होतात असं मानलं जातं. पण असं नाहीये

According to Science, Men Mature Later Than Women | सायन्सनुसार पुरूषांना महिलांच्या तुलनेत उशीरा येते मॅच्युरिटी!

सायन्सनुसार पुरूषांना महिलांच्या तुलनेत उशीरा येते मॅच्युरिटी!

Next

(Image Credit : www.mic.com)

सामान्यपणे ग्रॅज्युएशन झाल्यावर लोक मॅच्युअर होतात असं मानलं जातं. त्यासोबतच पुरूष महिलांपेक्षा अधिक आणि लवकर मॅच्युअर होतात असाही एक समज आहे. पण हे खरं नसून एक गैरसमज असल्याचं एका रिसर्चमधून समोर आलं आहे. नुकताच University of Oxford द्वारे एक रिसर्च करण्यात आला. यात रिसर्चमध्ये ४ ते ४० वर्षापर्यंतच्या १२१ लोकांचा समावेश करून त्यांच्या मेंदूची टेस्ट केली. यादरम्यान वैज्ञानिकांना आढळलं की, पुरूषांच्या तुलनेत महिलांचा मेंदू लवकर वयस्क होतो.

(Image Credit : brightside.me)

brightside.me ने दिलेल्या वृत्तानुसार, याचा अर्थ हा होतो की, महिला पुरूषांपेक्षा लवकर Mature होतात. याचा रिसर्चचा उद्देश हे जाणून घेणे होता की, Maturation दरम्यान अशा कोणत्या गोष्टी होतात, ज्या बदलतात आणि कोणत्या गोष्टी होतात, ज्या समान असतात. या रिसर्चमध्ये आढळून आलं की, महिला आणि पुरूष दैनंदिन जीवनात समान क्षमतेने काम करतात. पण महिलांच्या तुलनेत पुरूषांचा विकास कामात उशीर आणतो. या रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, पुरूषांमध्ये मॅच्युरिटी ही ४० वयानंतर येते.

(Image Credit : www.medicalnewstoday.com)

तर UNAM मध्ये Physiology And Pharmacology On The Faculty Of Medicine चे प्राध्यापक Eduardo Calixto यांचं म्हणणं आहे की, पुरूषांचा मेंदू महिलांच्या मेंदुपेक्षा मोठा असतो. पण महिलांची कार्यक्षमता पुरूषांपेक्षा चांगली असते. याचं उदाहरण देताना त्यांनी सांगितले की, महिलांना रंगांची आणि चवीची जास्त समज असते.

Web Title: According to Science, Men Mature Later Than Women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.