मुलींना खूश करण्यासाठी हे खोटं बोलतात मुले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2018 15:54 IST2018-05-15T15:52:41+5:302018-05-15T15:54:52+5:30
एखादा पुरुष जर एखाद्या महिलेला इस्प्रेस करण्याचा विचार करत असेल तर तो खोटं नक्कीच बोलतो. पण याला काही अपवाद असू शकतात.

मुलींना खूश करण्यासाठी हे खोटं बोलतात मुले!
जर कुणाची प्रशंसा योग्य पद्धतीने केली तर कुणाचाही दिवस चांगला जाईल. खरंतर एखाद्याचं लक्ष आपल्याकडे आकर्षित करण्याची ही सर्वात चांगली पद्धत आहे. त्यामुळे एखादा पुरुष जर एखाद्या महिलेला इस्प्रेस करण्याचा विचार करत असेल तर तो खोटं नक्कीच बोलतो. पण याला काही अपवाद असू शकतात.
आवड-निवड
पहिल्या भेटीतच जर तुम्ही तुमच्या आवडी-निवडी जुळत असल्याच्या गोष्टींनी आनंदी होत असाल तर घाई करु नका. अनेक पुरुष आपल्या डेटला खूश करण्यासाठी आपल्या आवडीनिवडीबाबत खोटं बोलू शकतात. त्यामुळे तुम्हाला जर जराही शंका आली, तर त्याबाबत जरा खोलात जाऊन विचारपूस करा. जेणेकरुन सत्य तुम्हाला कळेल.
जुने रिलेशनशिप
काही लोक स्वत:ला बरोबर सिद्ध करण्यासाठी आधीची गर्लफ्रेन्ड किंवा परिस्थीतींना दोषी ठरवतात. ते त्यांच्या भूतकाळाची दुखद कहाणी तुम्हाला ऐकवतात, जेणेकरुन त्यांना सहानुभूती मिळावी. त्यामुळे प्रत्येक गोष्टीवर अंधपणे विश्वास ठेवण्याअगोदर एकदा त्याचा भूतकाळ तपासून बघणे कधीही चांगले.
स्वत:ला हायफाय दाखवणे
सॅलरीबाबत खोटं बोलणं किंवा आपली लाईफस्टाईलबद्दल आहे त्यापेक्षा अधिक वाढवून सांगणे ही कॉमन बाब आहे. खरंतर असं करणं त्यांना महागातही पडू शकतं.
तुमच्या मित्र-मैत्रीणींबद्दल आपुलकी
भलेही त्याला तुमच्या मित्रांबद्दल काही आपुलकी वाटत नसेल तरी ते याबाबत खोटं बोलू शकतात. तसं हे खोटं फार काही वाईट करणारं नाहीये. पण याबाबतही इमानदारी असायला हवी.