(Image Credit : A Conscious Rethink)

जर तुम्हाला तुमच्या बॉयफ्रेन्डवर थोडाही संशय असेल की, तो तुमच्याबाबत अजूनही संभ्रमित आहे तर वेळीच याकडे लक्ष द्या. कारण हे तुम्हालाही नको असेल की, तुम्ही तुमचा वेळ, ऊर्जा आणि प्रेम अशा व्यक्तीसाठी वाया घालवावं ज्याला तुमच्यासोबत लॉंगटर्म रहायचंच नाहीये. अर्थात तुमचा बॉयफ्रेन्ड तुम्हाला येऊन सांगणार नाही की, तो तुमच्याबाबत निश्चित नाहीये. तुम्हालाच त्याच्या वागण्यावरून ते ओळखावं लागेल. आम्ही तुम्हाला अशाच काही संकेतांबाबत सांगत आहोत, ज्यावरून तुम्ही ओळखू शकाल की, त्याने तुमच्याबाबत काहीही निश्चित केलेलं नाही.

आधीच्या गर्लफ्रेन्डबाबत सॉफ्ट कॉर्नर

(Image Credit : bestlifeonline.com)

जर तुमचा बॉयफ्रेन्ड अजूनही त्याच्या जुन्या नात्याची चर्चा करत असेल तर याचा अर्थ होतो की, अजूनही त्यातून बाहेर आलेला नाहीये. जर तो तुम्हाला सांगत असेल की, त्याची एक्स आता त्याची चांगली मैत्रिण आहे आणि ते सोबत वेळही घालवत नाहीत, तर हा इशारा तुम्ही समजायला हवा.

मित्रांना किंवा परिवारातील सदस्यांना भेटवत नसेल

(Image Credit : Bustle)

जर त्याने तुम्हाला आतापर्यंत त्याच्या मित्रांशी किंवा घरातील सदस्यांशी भेटवलं नसेल तर नक्कीच काहीतरी गोंधळ आहे. हे त्यालाही माहीत असतं की, एकदा जर त्याने त्याच्या ओळखीच्या लोकांशी तुमची भेट करून दिली तर तुम्ही त्याची ऑफिशिअल गर्लफ्रेन्ड व्हाल.

कोणताही प्रयत्न नसेल

तुम्हाला खूश करण्यासाठी किंवा तुमच्याप्रति प्रेम जाहीर करण्यासाठी तो काही एक्स्ट्रा प्रयत्न करत नसेल किंवा तुमची काळीज घेत नसेल, किंवा ज्यातून तुम्हाला आनंद मिळतो अशा छोट्या छोट्या गोष्टी स्कीप करत असेल तर वेळीच सावध व्हा. तुमच्या मनात जर हा विचार येत असेल की, हे रिलेशनशिप चांगलं करण्यासाठी तुम्ही एकटेच मेहनत घेत आहात, तर यावर आणखी विचार करायला हवा.

मोकळेपणाने वागत नसेल

(Image Credit : psychologytoday.com)

जर तुमच्यासोबत तो त्याच्या फीलिंग्स शेअर करत नसेल. त्याला काय वाटतं हे तुम्हाला माहीत नसेल किंवा त्याला काय आवडतं हे तुम्हाला माहीत नसेल तर ही गोष्ट वाईट आहे. तो तुमच्याबाबत शुअर नाही हा त्याचा संकेत असू शकतो.


Web Title: 4 signs boyfriend who not sure about relationship
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.