२०२० मध्ये कोणत्या राशीचं लव्हलाईफ कसं असेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2019 16:49 IST2019-12-24T15:33:32+5:302019-12-24T16:49:59+5:30
नविन वर्ष सुरू होण्यासाठी काही दिवसच राहीले आहेत. नववर्षाच्या सुरूवातीला प्रत्येकजण उत्सूक आहे कि त्यांना हे वर्ष कसं जाईल.

२०२० मध्ये कोणत्या राशीचं लव्हलाईफ कसं असेल
नविन वर्ष सुरू होण्यासाठी काही दिवसच राहीले आहेत. नववर्षाच्या सुरूवातीला प्रत्येकजण उत्सूक आहे कि त्यांना हे वर्ष कसं जाईल. या सगळ्या प्रश्नांपैकीच एक म्हणजे जे लोक सिंगल आहेत त्यांना आपल्याला पार्टनर कसा मिळणार हा प्रश्न सतावत आहे. या नविन वर्षात पार्टनर मिळणार कि नाही तसंच जर मिळाला तर तो कसा असेल असा प्रश्न पडत असेल तर आज तुम्हाला १२ राशीच्या नवीन वर्षातील जीवनाबद्दल सांगणार आहे. ज्यामुळे तुम्हाला कळेल की येणारया वर्षात तुमचं लव्ह लाईफ कसं असेल. चला तर मग जाणून घेऊया या राशींबद्दल .
मेष
मेष राशीच्या लोकांच्या जीवनात सुरूवातीचे काही महिने प्रेम आणि आनंदात जाणार आहेत. जर तुम्हाला कोणी आवडत असेल तर तुम्ही या कालावधीत तुमच्या पार्टनरला प्रपोज सुध्दा करु शकता. म्हणजेच जे सिंगल आहेत त्यांना पार्टनर नक्कीच मिळू शकतो.
वृषभ
वृषभ राशीच्या लोकांचे प्रेम जीवन अगदी सामान्य असेल. जर नात्यांमध्ये अहंकाराची भावना असेल तर नातं कमकुवत होऊ शकतं. यासाठी पार्टनरसोबत राहणं गरजेचं आहे. त्यामुळ जर राग आला असेल तर संयम बाळगा.
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांसाठी हे नवीनपुर्ण प्रेम आणि रोमांस यांनी बहरलेले असेल. तुमचा पार्टनर तुमच्या चुकांना माफ सुध्दा करेल. तसंच ज्यांचं लग्न झालेलं नाही त्यांच लग्न होण्याची शक्यता आहे.
कर्क
कर्क राशीच्या लोकांना या वर्षात भरपूर प्रेम मिळणार आहे. तसंच लहान- मोठ्या तक्रारी तसंच भांडण ही नात्यांमध्ये होत राहतील. परंतू तुमच्या पार्टनरचे तुमच्यावरचे प्रेम कमी होणार नाही. अनेक सिन्गल लोकांची लग्न होण्याची शक्यता आहे. ज्यांचे लग्न झाले आहे त्यांनी एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर पासून जरा चार लांब राहिलेलं योग्य ठरेल कारण त्यामुळे तुमची बदनामी होऊ शकते.
सिंह
सिंह राशीचे व्यक्ती हे या वर्षात आपल्या पार्टनरला कमी वेळ देणार आहेत. त्यामुळे तुमच्यात आणि तुमच्या पार्टनरमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे थोडं सावधगिरीने वागा.
कन्या
कन्या राशीच्या लोकांना त्यांचा पार्टनर भरपूर साथ देणार आहे. तुम्हाला या वर्षी पार्टनरसोबत फिरायला जाण्याचा योग येणार आहे. तसंच लग्न करण्याचा विचार सुद्दा तुम्ही या वर्षी करु शकता.
तुळ
तुमच्या प्रेमाने भरलेल्या नात्याला वाचवण्यासाठी जास्त चिडचिड करणं थांबवायला हवं. अन्यथा नात तुटण्याची शक्यता असते. जर तुमचा लग्न करायचा विचार असेल तर मे महिना ते सप्टेंबर पर्यंत तुम्ही लग्न करू शकता.
वृश्चिक
या राशीच्या लोकांच्या जीवनात अनेक चढउतार घेण्याची शक्यता आहे. उगाच शुल्लक कारणावरून आपल्या पार्टनरवर संशय घेऊ नका. नाहीतर नातं तुटू शकतं.
धनु
हे नविन वर्ष धनु राशीच्या लोकांसाठी प्रेमाने भरलेलं असेल. नात्यांमध्ये लहानं मोठे चढ-उतार येतील पण त्याचा परीणाम तुमच्या नात्यावर होणार नाही. कोणताही निर्णय घेताना घाई करू नका.
मकर
मकर राशीच्या लोकांसाठी हे त्यांचे पार्टनरसोबतचे संबंध अजून चांगले राहतील. जर तुम्ही लव्ह मॅरेज करायचा विचार करत असाल तर हे वर्ष तुमच्यासाठी उत्तम ठरेल.
कुंभ
कुंभ राशीच्या लोकांच्या प्रेमजीवनात या वर्षी अनेक कठिण प्रसंग येतील. तुमच्या पार्टनरला तुमच्या सवयी खटकू शकतात. ज्या गोष्टी करणं पार्टनरला आवडत नाही त्या टाळण्याचा प्रयत्न करणं फायदेशीर ठरेल.
मीन
२०२० मध्ये मीन राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल झालेला दिसून येईल. जर तुमच्याशी कोणाचं भाडणं झालं असेल तर ते पहिल्याच महिन्यात दूर होईल. कामाच्या व्यापात तुम्ही तुमच्या पार्टनरला पुरेपूर वेळ देऊ शकणार नाही.