शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ग्रीन होम म्हणजे काय? घर बांधायचं असेल तर याचा विचार करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 19:38 IST

'हे विश्वची माझे घर' ही आपली भारतीय संकल्पना या घरासाठी एकाअर्थाने वापरली जाते. म्हणजे आपल्याला निसर्गातून जी साधनसंपत्ती उपलब्ध होते तिचा मुक्त वापर यामध्ये केला जातो.

मुंबई- तुम्ही घर घेण्याचा विचार करत आहात का?  मग ग्रीन होम्सचाही विचार करायला हरकत नाही. आता ग्रीन होम्स म्हणजे नक्की काय ते आधी पाहू. 'हे विश्वची माझे घर' ही आपली भारतीय संकल्पना या घरासाठी एकाअर्थाने वापरली जाते. म्हणजे आपल्याला निसर्गातून जी साधनसंपत्ती उपलब्ध होते तिचा मुक्त वापर यामध्ये केला जातो.हवा, सूर्यप्रकाश ही निसर्गाने दिलेली देणगी घरांसाठी मुबलक वापरायची आणि प्रदूषण कमीत कमी करायचे असा त्याचा मागचा मूळ उद्देश आहे. ही झाली ढोबळ व्याख्या. पण वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये त्याची वेगवेगळी व्याख्या केल्याचेही दिसून येते. ग्रीन होम्स ही आपल्या नेहमीच्या बांधकामापेक्षा शाश्वत टिकणाऱ्या साधनांच्या मदतीने वापरलेली आणि कमीतकमी ऊर्जा वापरून बांधलेली असतात.ग्रीन होम्स कशासाठी?- घरोघरी होणारा वीज आणि पाणी यांचा वापर आपल्या खिशावर परिणाम करत असतो. उन्हाळा आला की वीजेचं बिल वाढतं. वीज ही भरपूर वापरली जाते. घरांची दारं-खिडक्या बंद होऊन वातानुकूलन यंत्रणा म्हणजेच एसी सुरु केले जातात. यामुळे खर्चही वाढतो. मात्र ग्रीन होम्समध्ये नैसर्गिक ऊर्जेचा अधिकाधिक वापर केला जातो. या नव्या यंत्रणेमध्ये सौर ऊर्जेचा वापर करुन तयार झालेली वीज वापरली जाते. रेन वॉटर हार्वेस्टींग करुन भूजल पातळी वाढवली जाते. पावसाचे पाणी वाचवून त्याचा उपयोग दैनंदिन वापरासाठी केला जातो. यामुळे तुमच्या वीजेच्या बिलावर मोठा परिणाम होऊ शकतो आणि त्यात 20 ते 30 टक्के कपात होऊ शकते.आरोग्यासाठी काय फायदा?- ग्रीन होम्समध्ये नैसर्गिक साधनांचा जास्त वापर केल्यामुळे हवेशिर आणि उत्तम प्रकाशव्यवस्थेची योजना केलेली असते. नैसर्गिक हवेचा उपयोग, हवा शुद्धीकरणासाठी नैसर्गिक उपायांचा वापर, झाडांचा अधिकाधिक वापर, खिडक्यांमधून प्रकाश जास्त यावा अशी केलेली योजना, सौर चिमणी, एक्झॉस्ट फॅनचा वापर, नैसर्गिक रंगांचा वापर यामुळे तुमचे राहणीमान आरोग्यवर्धक होते.

उत्तम जीवनशैली- इको फ्रेंडली वस्तूंचा वापर घरामध्ये केल्यामुळे तुमची जीवनपद्धती निसर्गाशी एकदम पूरक होते. उदाहरणार्थ ग्रीन होम्समध्ये बांबू, पुनर्वापर केलेले धातूचे सुटे भाग, क्ले प्लॅस्टर, इको फ्रेंडली फर्निचर, बांबूचे फर्निचर, फिक्या रंगाची अंतर्गत सजावट केल्यामुळे एकूण जीवनशैली सुधारते.

टॅग्स :Real Estateबांधकाम उद्योगHomeघरenvironmentवातावरण