देशाच्या राजधानीत रिअल इस्टेट क्षेत्रातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि ऐतिहासिक व्यवहार समोर आला आहे. दिल्लीतील अतिशय सुरक्षित आणि प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या 'ल्युटियन्स बंगला झोन' मधील टिहरी गढवालचे महाराज मनुजेंद्र शाह यांचा ३.२ एकरचा आलिशान बंगला तब्बल १,००० कोटी रुपयांना विकला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
हा बंगला भगवान दास रोडवरील ५ क्रमांकाच्या प्लॉटवर स्थित आहे. या व्यवहाराने दिल्लीच्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये मोठी खळबळ उडवली आहे. विशेष म्हणजे, हा बंगला खरेदी करणारा उद्योजक देशातील प्रतिष्ठित अन्न आणि पेय उद्योगाशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे.
नेहरूंच्या बंगल्यानंतर हा दुसरा मोठा व्यवहारयाच गूढ खरेदीदाराने काही काळापूर्वी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे पहिले अधिकृत निवासस्थान असलेला बंगला (१७, मोतीलाल नेहरू मार्ग) सुमारे १,१०० कोटी रुपयांना खरेदी करण्याचा करार केला होता. आता टिहरीच्या महाराजांचा बंगलाही याच व्यक्तीने घेतल्यास, एकाच उद्योजकाचा या भागातील एकूण व्यवहार २,१०० कोटींच्या घरात जाईल.
ल्युटियन्स झोनचे महत्त्वचब्रिटिश आर्किटेक्ट एडविन ल्युटियन्स यांनी डिझाइन केलेला हा २८ चौरस किलोमीटरचा परिसर देशातील सर्वात शक्तिशाली लोकांचे निवासस्थान मानला जातो. येथे सुमारे ३,००० बंगले आहेत, परंतु त्यापैकी केवळ ६०० खाजगी मालकीचे आहेत. यामुळेच येथील जमिनीच्या किमती आकाशाला भिडलेल्या असतात.
Web Summary : A ₹1,000 crore deal is brewing in Delhi's Lutyens zone. Maharaja Manujendra Shah's 3.2-acre bungalow is set to be sold to a prominent food and beverage entrepreneur who also purchased Nehru's former residence for ₹1,100 crore. This would bring the buyer's total investment to ₹2,100 crore.
Web Summary : दिल्ली के लुटियंस जोन में ₹1,000 करोड़ की डील होने वाली है। महाराज मनुजेंद्र शाह का 3.2 एकड़ का बंगला एक प्रमुख खाद्य और पेय उद्यमी को बेचा जाएगा, जिसने नेहरू का पूर्व निवास भी ₹1,100 करोड़ में खरीदा था। इससे खरीदार का कुल निवेश ₹2,100 करोड़ हो जाएगा।