शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

ऐन गणेशोत्सवात चिपळूण हादरले; तरुणाचा दगडाने ठेचून खून; एकाला अटक, एक अल्पवयीन ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2024 11:50 IST

कारण अद्याप अस्पष्ट

चिपळूण : ऐन गणेशोत्सवात शहरातील बहादूरशेख नाका येथे रविवारी सकाळी एका तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळल्याने एकच खळबळ उडाली. हमीद अहमद शेख (वय ३८, रा. काविळतळी, चिपळूण) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पाेलिसांनी अवघ्या दीड तासात एका तरुणाला अटक केली असून एका अल्पवयीनला ताब्यात घेतले आहे. या दोघांनी खून केल्याची कबुली दिली आहे. मात्र, अद्याप खुनाचे कारण स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.या खूनप्रकरणी चिपळुणातील वडार काॅलनी येथे राहणाऱ्या नीलेश अनंत जाधव (२८) याला अटक केली असून एका अल्पवयीन मुलाला पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे. रविवारी सकाळी ८ वाजता शहरातील बहादूरशेख नाक्याजवळ वडार कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका दुकानासमोर एक तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे काही नागरिकांना दिसले. याची माहिती मिळताच, उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे, गुन्हे प्रकटीकरण विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक हर्षद हेंगे व त्यांच्या सहकारी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.या तरुणाच्या डोक्याजवळच रक्ताने माखलेला एक दगड सापडल्याने हा खून असल्याचा संशय पाेलिसांना आला. हमीदशी झालेल्या किरकोळ वादातून हा खून झाल्याचे समोर येत आहे. हा प्रकार शनिवारी मध्यरात्री घडला असून, दोघांनीही मद्यप्राशन केल्याची कबुली नीलेश व त्याच्या सहकाऱ्याने पोलिसांना दिली आहे. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे करीत आहेत. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी चिपळूण येथे येऊन माहिती घेतली.

हमीद उत्तम क्रिकेटरहमीद शेख हा अंडरआर्मचा उत्तम क्रिकेटर होता. ‘कलर’ या टोपण नावाने त्याला ओळखले जायचे. काविळतळी येथील तौसा अँड तौसा संघातून ताे खेळायचा. मात्र, गेल्या काही वर्षांपासून त्याला व्यसन लागले हाेते. पेट्रोल व भुरट्या चोरीप्रकरणी त्याच्यावर काही गुन्हेही दाखल झाले होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीChiplunचिपळुणCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस