Ratnagiri: बिबट्याच्या हल्ल्यात तरुण जखमी, साखरपा येथील घटना

By मनोज मुळ्ये | Updated: June 21, 2024 12:19 IST2024-06-21T12:19:18+5:302024-06-21T12:19:52+5:30

साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील साखरपा येथील जाधववाडीमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात एक तरुण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली आहे. अमित ...

Youth injured in leopard attack, incident at Sakharpa Ratnagiri | Ratnagiri: बिबट्याच्या हल्ल्यात तरुण जखमी, साखरपा येथील घटना

Ratnagiri: बिबट्याच्या हल्ल्यात तरुण जखमी, साखरपा येथील घटना

साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील साखरपा येथील जाधववाडीमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात एक तरुण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली आहे. अमित जाधव असे या तरुणाचे नाव असून त्याला अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जाधववाडी येथे अमितच्या घराचे काम सुरू आहे. ते पाहण्यासाठी अमित सकाळी तेथे गेला. त्यावेळी घराजवळच दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. त्यात अमितच्या डोक्याला तसेच हाताला दुखापत झाली आहे. आरडाओरडा झाल्याने बिबट्या तेथून पळून गेला. साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून अमितला रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

Web Title: Youth injured in leopard attack, incident at Sakharpa Ratnagiri