शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
4
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
5
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
6
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
7
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
8
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
9
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
10
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
11
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
12
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
13
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
14
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
15
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
16
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
17
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
18
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
19
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
20
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त

पोहताना तलावात बुडून तरुणाचा मृत्यू, गुहागरातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2023 17:43 IST

सर्वजण घरी निघाले असता काही अंतरावरुन पुन्हा तलावाकडे गेला अन्..

संकेत गाेयथळेगुहागर : मित्रांसाेबत पाेहून झाल्यानंतर पुन्हा तलावात पाेहायला गेलेल्या काेंडकारुळ (ता. गुहागर) येथील २४ वर्षीय तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाला. प्रज्याेत मेहता (रा. जागकरवाडी, काेंडकारूळ, गुहागर) असे तरुणाचे नाव आहे. ही घटना काल, बुधवारी (५ जुलै) साखरी आगर येथे घडली. प्रज्योत हा आपल्या मित्रांसमवेत बुधवारी दुपारी साखरी आगर येथील तलावामध्ये पोहण्यासाठी गेला होता. त्याच्यासोबत कोंडकारूळ येथील दोघेजण होते. तर यावेळी तलावात वेळणेश्वर व साखरी आगर येथील काही तरुणही पोहत होते. दुपारपासून सायंकाळपर्यंत हे सर्वजण तलावात पाेहत हाेते. सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान हे सर्वजण घरी निघाले.तलावापासून काही अंतरावर साखरीआगर फाटा येथे गेल्यानंतर प्रज्योतने आपल्यासमवेत दुचाकीवर असलेल्या मित्रांना मला पुन्हा पोहायचे आहे, असे सांगत दुचाकी तलावाकडे नेली. मित्रांनी आपण आता घरी जाऊया, असे त्याला सांगितले. मात्र, मित्रांचे न ऐकता प्रज्योतने पाण्यामध्ये उडी मारली. बराचवेळ झाला तरी तो पुन्हा वर आला नाही. आपला मित्र पाण्याच्या बाहेर येत नाही, असे लक्षात येताच त्याच्यासोबत असलेल्या मित्रांनी पाण्यात उडी मारली आणि त्याला पाण्यातून बाहेर काढले. तातडीने त्यांनी पोटातील पाणी काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो कोणतीच हालचाल करत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले.त्या मित्रांनी तात्काळ त्याला हेदवी येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गुहागरचे पोलिस निरीक्षक सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली लुकमान तडवी, किशोर साळवी यांनी पंचनामा केला. गुहागर पोलिस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीdrowningपाण्यात बुडणेSwimmingपोहणेDeathमृत्यू