शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: घोणसरेतील भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू, ट्रक जळून खाक; वाहतूक विस्कळीत 

By संदीप बांद्रे | Updated: October 23, 2024 14:03 IST

चिपळूण : गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील घोणसरे- चिवेली फाटा येथे काल, मंगळवारी रात्री ट्रक व दुचाकी यांच्यामध्ये भीषण अपघात ...

चिपळूण : गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील घोणसरे- चिवेली फाटा येथे काल, मंगळवारी रात्री ट्रक व दुचाकी यांच्यामध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर आणखी एक तरुण गंभीर जखमी झाला. अपघातादरम्यान आयशर ट्रकला अचानक लागून ट्रक जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले.सौरभ अनिल घोरपडे (२६, मार्कंडी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तसेच प्रफुल कदम (चिवेली) हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर डेरवण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी आयशर ट्रक चालक रमाकांत जाधव ( ५९, शृंगारतळी, गुहागर) याला ताब्यात घेतले आहे. मृत सौरभ घोरपडे हा तरुण चिपळुणातील एका फायनान्स कंपनी वसुलीचे काम करत होता.गुहागरकडून-चिपळूणकडे येणाऱ्या भंगार वाहतूक करणाऱ्या आयशर ट्रकची दुचाकीस्वाराला डाव्या बाजूस जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले. येथे मोठ्या प्रमाणावर जमा झालेल्या नागरिकांनी या अपघाताबाबत संताप व्यक्त केला.

अपघातानंतर अचानक या ट्रकला आग लागली. ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात पुट्टा होता. त्यामुळे काही क्षणात आगीने रौद्र रूप धारण केले. यामध्ये ट्रक जळून खाक झाला. अपघातामुळे चिपळूण-गुहागर मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. गुन्ह्याची नोंद करण्याचे काम उशिरा पर्यंत सुरू होते. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीChiplunचिपळुणAccidentअपघातDeathमृत्यूfireआग