शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

रत्नागिरीत खवळलेल्या समुद्रात पडून तरुणी बेपत्ता, भगवती किल्ल्यानजीकची घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 13:15 IST

अपघात की आत्महत्या हा प्रश्नच 

रत्नागिरी : शहरातील भगवती किल्ल्याजवळील पाणभुयार स्पॉटजवळ एक तरुणी खवळलेल्या समुद्रात पडून बेपत्ता झाली. ही तरुणी सेल्फी काढण्याच्या नादात पाय घसरुन पाण्यात पडली की तिने समुद्रात उडी घेत आत्महत्या केली, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. रविवार २९ जून रोजी दुपारी साडेबारा वाजता घडलेल्या या प्रकारानंतर सायंकाळी उशिरापर्यंत तिला शोधण्याचे सर्वच प्रयत्न अयशस्वी झाले. ती कोण आहे, याचा उलगडाही सायंकाळी उशिरापर्यंत झालेला नव्हता.सुटीच्या दिवशी भगवती किल्ल्याजवळ असलेली शिवसूष्टी पाहण्यासाठी स्थानिक लोकांसह बाहेरील पर्यटकांचीही मोठी गर्दी दिवसभर असते. रविवारी २९ जून रोजीही दुपारी येथे पर्यटकांची गर्दी होती. त्यावेळी २३ ते २५ वर्षीय तरुणी पाण-भुयार स्पॉटजवळ असलेल्या रेलिंगच्या पुढे जाऊन सेल्फी काढण्यात गुंग होती. सेल्फी काढताना तिने आपले चप्पल आणि स्कार्फ बाजूला काढून ठेवले होते. आजुबाजुला अन्य काही पर्यटकही निसर्गाचा आनंद लुटत असताना अचानक ती तरुणी अचानक सुमारे २०० ते २५० फूट खोल समुद्राच्या पाण्यात पडलेली दिसली.आजूबाजूच्या पर्यटकांनी आरडाओरडा करताच त्या ठिकाणी एकच गर्दी झाली. काहींनी शहर पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु तत्पूर्वी ती तरुणी खवळलेल्या समुद्रात दिसेनाशी झाली.दरम्यान, या तरुणीचा शोध घेण्यासाठी रत्नदुर्ग माऊंटेनियर्स आणि एनडीआरएफच्या पथकाला बोलावण्यात आले. परंतु सोसाट्याचा वारा आणि खवळलेला समुद्र यामुळे त्या तरुणीचा शोध घेण्यात अडथळे येत आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत ही मोहीम सुरू होती.

धोकादायक ठिकाणी जाणे टाळारत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी संबंधित अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश माईनकर, शहर पोलिस निरीक्षक सतीश शिवरकर यांच्याशी चर्चा करुन त्यांना भविष्यात अशाप्रकारच्या घटना त्याठिकाणी घडू नयेत यासाठी काही उपाययोजना करण्याबाबत सूचना दिल्या. तसेच नागरिकांनी पावसाळ्यात धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले आहे.

सोबत कोणीच नव्हते?ही तरुणी खाली पडल्यानंतर कोणीही तिच्याबाबत माहिती देण्यासाठी पुढे आले नाही. त्यामुळे ती तेथे एकटीच आली होती का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जर ती एकटीच आली होती तर तिने आत्महत्या केली आहे का, असा प्रश्नही केला जात आहे.