पानवल येथील अपघातात तरुण गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 13:18 IST2020-11-19T13:17:25+5:302020-11-19T13:18:29+5:30
accident, ratnagirinews ट्रक आणि दुचाकी यांच्यामध्ये झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना गुरूवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या दरम्याने पानवल येथे घडली. यामध्ये लक्ष्मण तानाजी सोनवडकर (२७) हा तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पानवल येथील अपघातात तरुण गंभीर
रत्नागिरी : ट्रक आणि दुचाकी यांच्यामध्ये झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना गुरूवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या दरम्याने पानवल येथे घडली. यामध्ये लक्ष्मण तानाजी सोनवडकर (२७) हा तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
लक्ष्मण सोनवडेकर गुरूवारी सकाळी कामावरून करबुडे येथे आपल्या घरी जात होता. रत्नागिरी - हातखंबा मार्गावरील पानवल येथे तो आला असता समोरून येणारा ट्रक आणि दुचाकीची जोरदार धडक झाली. यामध्ये लक्ष्मण याला गंभीर दुखापत झाली. या अपघातानंतर जखमी दुचाकीस्वार रस्त्यावर विव्हळत पडला होता.
अपघातानंतर रस्त्यावर बघ्यांची गर्दी झाली होती. मात्र, दुचाकीस्वाराला उचलण्यास कोणी पुढे येत नव्हते. अखेर या अपघाताची माहिती मुन्ना देसाई यांना मिळाली. त्यांनी घटनास्थळी जाऊन जखमी लक्ष्मण याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.