खाडीत बुडून तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2021 11:54 IST2021-02-02T11:52:06+5:302021-02-02T11:54:20+5:30
Death Chiplun Ratnagiri- चिपळूण तालुक्यातील केतकी खाडीत तरुणाचा मृतदेह आढळला. मिलिंद भिवा सैतवडेकर (३२ केतकी-भोईवाडी, चिपळूण) असे या तरुणाचे नाव आहे.

खाडीत बुडून तरुणाचा मृत्यू
ठळक मुद्देखाडीत बुडून तरुणाचा मृत्यूमृतदेह केतकी स्मशानभूमीजवळ आढळला पाण्यात
चिपळूण : तालुक्यातील केतकी खाडीत तरुणाचा मृतदेह आढळला. मिलिंद भिवा सैतवडेकर (३२ केतकी-भोईवाडी, चिपळूण) असे या तरुणाचे नाव आहे.
मिलिंद याचा भाऊ महेंद्र भिवा सैतवडेकर यांनी पोलिसांना माहिती दिली. मिलिंद हा बहीण वैष्णवी कासेकर हिला धामणदेवी भोईवाडी येथे कोंबडीचे खाद्य देण्याकरिता केतकी ते धामणदेवी असा होडीने जात होता.
अचानक मोठ्याने ओरडण्याचा आवाज आला. कासेकर यांनी मागे पाहिले असताना मिलिंद होडीमध्ये नव्हता. त्याचा मृतदेह केतकी स्मशानभूमीजवळ पाण्यात आढळला.