Ratnagiri: अणुस्कुरा घाटातील दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर, दुचाकी वाहतूक सुरू
By मनोज मुळ्ये | Updated: June 14, 2024 14:26 IST2024-06-14T14:25:57+5:302024-06-14T14:26:41+5:30
रत्नागिरी : पाऊस नियमित सुरू होण्याआधीच राजापूर तालुक्यातील अणुस्कुरा घाटात गुरुवारी रात्री दरड कोसळली आणि कोल्हापूरकडे जाणारा हा घाट ...

Ratnagiri: अणुस्कुरा घाटातील दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर, दुचाकी वाहतूक सुरू
रत्नागिरी : पाऊस नियमित सुरू होण्याआधीच राजापूर तालुक्यातील अणुस्कुरा घाटात गुरुवारी रात्री दरड कोसळली आणि कोल्हापूरकडे जाणारा हा घाट बंद झाला. शुक्रवारी दुपारपर्यंत येथे ब्लास्टिंगचे काम युद्धपातळीवर सुरू असले तरी अजूनही पूर्ण मार्ग मोकळा झालेला नाही.
गेली अनेक वर्षे पावसाळ्यात दरडी कोसळणारा मार्ग अशीच अणुस्कुरा घाटाची ओळख आहे. राजापूर तालुक्यातून कोल्हापूरला जाण्यासाठी हा जवळचा मार्ग आहे. गुरुवारी रात्री या घाटात भलीमोठी दरड रस्त्यावर आली आणि मार्ग बंद झाला. दरड मोठी असल्याने सकाळपर्यंत मारर्ग बंद राहील, हे आधीच जाहीर करण्यात आले. ब्लास करुन दरड फोडण्याचे काम सकाळपासून अखंडितपणे सुरू आहे. जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावर आलेली मातीही हटवली जात आहे. मात्र दुपारपर्यंत रस्ता पूर्ण मोकळा झाला नव्हता.
रस्त्याची एक बाजू साफ करुन दुचाकी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. सायंकाळपर्यंत हे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. पावसाळा सुरू झाला असला तरी तो अजूनही नियमित नाही. मात्र तरीही येथे दरड कोसळल्याने मुसळधार पावसात या मार्गाचे काय होणार, याबाबत प्रश्नच आहे.